शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाखांच्या स्टील कचराकुंड्या कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

केंद्र सरकारची सध्या स्वच्छतेवर बारीक नजर असून स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र अंमलात आणून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत आपले शहर असो वा गाव स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात असून त्यासाठी रँकींगही दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात नानाविध प्रयोग केले जात आहेत.

ठळक मुद्देपैशांची नाहक नासाडी : नगर परिषदेचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील क चरा इकडे-तिकडे न फेकता कचराकुंडीत जमा केला जावा यासाठी नगर परिषदेने मागील वर्षी शहरात ठिकठिकाणी स्टील ड्रमपासून बनविलेल्या कचराकुंड्या लावल्या. मात्र आजघडीला यातील कित्येक कचराकुंड्या खुद्द कचºयात दिसून येत आहे. सुमारे २०० कचराकुंड्या शहरात बसविण्यात आल्याची माहिती आहे.केंद्र सरकारची सध्या स्वच्छतेवर बारीक नजर असून स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र अंमलात आणून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. यांतर्गत आपले शहर असो वा गाव स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात असून त्यासाठी रँकींगही दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात नानाविध प्रयोग केले जात आहेत. यातच मागील वर्षी कचरा रस्त्यांच्या काठावर किंवा नाल्यांमध्ये टाकला जाऊ नये यासाठी स्टील ड्रमपासून तयार करण्यात आलेल्या कचराकुंड्या शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आल्या. ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यासाठी या कचराकुंडयांत दोन ड्रम वापरण्यात आले आहेत.सुमारे १४ हजार रूपयांची एक कचराकुंडी असून अशा सुमारे २०० कचराकुंड्या शहरात बसविण्यात आल्या. नगर परिषदेने एका उदात्त हेतूने या कचराकुंड्या बसविल्या त्यात काहीच शंका नाही. मात्र या कचराकुंड्या बसविण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या कचराकुंड्यांची दुर्गत झाली आहे. कित्येक कचराकुंड्या लावलेल्या ठिकाणावरून गायब झाल्या असून कित्येकांची तोडफोड करण्यात आली आहे. तर कित्येक कचराकुंड्या आजघडीला खुद्द कचऱ्यात पडून असल्याचे दिसत आहे.सुमारे २८ लाख रूपये या कचराकुंड्यांवर खर्च करण्यात आले असून हा पैसा मात्र नाहक खर्च झाल्यासारखे हे चित्र बघून वाटत आहे.सिमेटच्या कुंड्या बिनकामाच्यानगर परिषदेने २ वर्षांपूर्वी ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिमेंटच्या कचराकुं ड्या बनविल्या होत्या. मात्र त्यातील कित्येक कुंड्यांची मोडतोड झाली आहे. शिवाय सिमेंट पाईपचाही कचराकुंड्याच्या स्वरूपात वापर करण्यात आला. मात्र त्यांचीही तोडफोड झालेली दिसते. तर कित्येक कुंड्या असूनही त्यांचा उपयोग होताना दिसत नाही. यामुळे नगर परिषद नवनवीन प्रयोग करीत असून त्यांचे प्रयोग फेल ठरत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका