शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांसाठी २.७० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:25 IST

वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देसन २०१६ मधील वादळीवारा : १५ तारखेपूर्वी होणार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वादळीवाºयातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने अखेर २ कोटी ७० लाख २१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. निधीचे येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात यावे असे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिले आहे.२१ मे २०१६ मध्ये आलेल्या वादळीवाºयामुळे तालुक्यातील ३ हजार २५६ लोकांचे सुमारे १ कोटी ३५ लाख रूपयांचे नुकसान झाले होते. तर जिल्ह्यातील ९ हजार ३३४ लोकांचे यात नुकसान झाले होते. आमदार अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी हा विषय विधानसभेत मांडला होता. फक्त तटीय क्षेत्रातच वादळीवाºयाने ग्रस्तांसाठी नियम असल्याने जिह्यातील नुकसानग्रस्त मदतीपासून वंचीत होते. मात्र आमदार अग्रवाल यांनी विशेष बाब म्हणून मदत उपलब्ध करवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती.यावर त्यांनी २.७० कोटींचा निधी मदतीसाठी मे महिन्यातच मंजूर केला होता. मात्र वित्त विभागाने आपत्ती घेत निधी वाटपावर रोक लावली होती. यावर आमदार अग्रवाल यांनी ३ आॅगस्ट रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उचलत विषय मांडला. अखेर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेत निधी मंजूर करण्याचे आदेश दिले. मात्र शासनाकडे निधी नसल्यामुळे व काही तांत्रीक अडचणींमुळे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात निधी उपलब्ध होऊ शकला नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीची आचरसंहिता लागल्यामुळे निधीच्या वाटपावर रोक लावण्यात आली. मात्र १ नोव्हेंबर रोजी नवे आदेश काढल्यानंतर २.७० कोटींचा निधीन जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाला आहे. प्रकरणी आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याशी चर्चा करून निधी वाटपाचे निर्देश दिले. तर येत्या १५ तारखेपर्यंत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे त्यांनी आमदार अग्रवाल यांना दिले आहे.