लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिलापूर येथील ट्रॅक्टर अपघातात एका दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी ट्रॅक्टरला आग लावली. चालकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणात मध्यस्थी करण्यास आलेल्या पोलिसांना ही धक्काबुक्की करणाºया २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर एमएच३५/जी-१६०२ या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने डेवीड चुटे या दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी वाहन चालक अनिल नुरेटी याला काठीने, दगडाने, विटांनी मारहाण केली होती. रॉकेल व तणीस टाकून ट्रॅक्टरला जाळण्यात आले. ट्रॅक्टर चालकाला मारहाण करीत असताना बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचाºयांना धक्काबुक्की व काठीने मारहाण करण्यात आली.अनिल नुरेटीला पोलिसांनी एमए३५/डी-५५७ या वाहनात बसवून उपचारासाठी नेत असतांना लोकांनी पोलीस वाहनाचा दरवाजा उघडून गाडीच्या दाराचा बेल्ट तोडला. यासंदर्भात पोलिसांनी मोबाईल व्हिडीओ रेकार्डीग केली आहे. यासंदर्भात शिलापूर येथील २६ लोकांवर भादंवीच्या कलम १४१,१४३, १४४,१४७,१४८,१४९,१५२,१५३,३४१,३५३,३५२,३३२, ३२४,४३५,४२७,५०६ सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.हे आहेत आरोपीशिलापूर येथील अपघात करणाºया ट्रॅक्टर चालकास मारहाण करणाºया व पोलिसांना धक्काबुक्की करणाºयामध्ये केशव चुटे, भूमेश्वर श्रीराम हुकरे, राजेश रहिले, अब्दल भोयर, संतोष शिवराम साऊसकर, पवन ग्यानीराम भुते, आनंद इंसाराम कोहळे, रामकृष्ण पांडूरंग चुटे, दिनेश मोतीराम रहिले, अजय गोपाल राऊत, केशव धनराज चुटे, लिमराज भैय्यालाल फुंडे, देवीदास श्रीराम भुते, पाडुरंग चुटे, ग्यानीराम रहिले, अनिल भोयर, अंजना चुटे, गणेश भांडारकर, चंद्रकुमार शेंडे, भुमेश्वर बिसेन, काल्या ग्यानीराम रहिले, लोकेश अजय उजवणे, शंकर रहिले, सखाराम फुंडे, चंद्रकुमार शेंडे, नरेश बघेले यांचा समावेश आहे.
ट्रॅक्टर जाळणाºया २६ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:37 IST
शिलापूर येथील ट्रॅक्टर अपघातात एका दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी ट्रॅक्टरला आग लावली. चालकाला बेदम मारहाण केली.
ट्रॅक्टर जाळणाºया २६ जणांवर गुन्हा दाखल
ठळक मुद्देपोलिसांना धक्काबुक्की : मोबाईलमध्ये केले चित्रीकरण