शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्याच्या विकासासाठी 255 कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. पुढे बोलताना मंत्री मलिक यांनी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ४४.७१ कोटी निधी अर्थसंकल्पित होता. त्यापैकी ४४.७० कोटी रुपये मिळाले आणि ते खर्चसुद्धा झाले आहेत. आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रअंतर्गत ४८.५० कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यांपैकी ४८.४८ कोटी रुपये म्हणजेच ९९.९५ टक्के खर्च झाला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे ८० कोटी रुपये असून, ही रक्कम लवकरच राज्य शासन देणार आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १६०.४५ कोटी रुपये सन २०२०-२१ या वर्षात खर्च करण्यात आले आहेत. मागील वर्षी १०० टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात १०.९३ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. पुढे बोलताना मंत्री मलिक यांनी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ४४.७१ कोटी निधी अर्थसंकल्पित होता. त्यापैकी ४४.७० कोटी रुपये मिळाले आणि ते खर्चसुद्धा झाले आहेत. आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रअंतर्गत ४८.५० कोटी रुपये निधी प्राप्त झाला. त्यांपैकी ४८.४८ कोटी रुपये म्हणजेच ९९.९५ टक्के खर्च झाला आहे.  सन २०२१-२२ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याला सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र असे एकूण २५४.९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सन २०२०-२१ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मेडिकल कॉलेज येथे विषाणू संशोधन प्रयोगशाळा १३०.६५ लाख रुपयांतून, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशनअंतर्गत ई-फेरफार प्रणाली अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना १४१.६० लाख रुपयांतून लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले.  राज्य पोलीस बटालियनला बंकबेडकरिता २४.७८ लाख रुपयांचा निधी, जिल्हा क्रीडासंकुलातील आधुनिक सोयीसुविधांसाठी ९०.२४ लाख, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या बैठकीच्या व्यवस्थेकरिता (डेस्क-बेंच) करिता १०३.८४ लाख, जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १० शासकीय गोदामांकरिता १२ लाखांचा निधी देण्यात आला. जिल्ह्यात नियोजन भवनाच्या इमारतीकरिता पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची माहिती पालकमंत्री मलिक यांनी दिली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, आमदार विनोद अग्रवाल, आमदार अभिजित वंजारी, आमदार सहेसराम कोरोटे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. 

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाची तयारी- कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बालरोग कक्ष उभारण्यात येणार आहे. धानाचा जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात गोदामाची समस्या असल्याने यानंतर जिल्हा नियाेजनातून धानासाठी गोदाम तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर राहणार नाही. ८० कोटी रुपये धानाचे चुकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आहेत, ते स्वातंत्र्यदिनानंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजूर होतील. ती रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच बोनसची ५० टक्के रक्कमही लवकरच मिळणार असल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकPraful Patelप्रफुल्ल पटेल