शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेत २५.४३ कोटींच्या जुन्या नोटा

By admin | Updated: June 22, 2017 00:07 IST

नक्षलवाद, आंतकवाद व भ्रष्ट्राचारावर लगाम लावण्याच्या नावावर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नक्षलवाद, आंतकवाद व भ्रष्ट्राचारावर लगाम लावण्याच्या नावावर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रूपयाच्या नोटा बंद केल्या आहेत. ह्या नोटबंदीला नऊ महिन्याचा कालावधी लोटला तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या २५ कोटी ४३ लाखाच्या नोटा अजूनही या बँकेकडे पडूनच आहेत. ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० व १००० च्या जून्या नोटांना बंद केल्यामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. या नोटबंदीला नऊ महिन्याचा काळ झाला असला तरी आताही बँकाच्या आर्थिक व्यवहारात सुधार आला नाही. गोंदिया जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅपरेटिव्ह बँकेकडे २५ कोटी ४३ लाख ४८ हजार ५०० रूपये जमा आहेत. यात ५०० रूपयाचे ३ लाख ५६ हजार २९३ नोट म्हणजेच १७ कोटी ८१ लाख ४६ हजार ५०० रूपये तर १००० च्या ७६ हजार २०२ नोट म्हणजेच सात कोटी ६२ लाख २ हजार रूपयाचे नोट आहेत. या नोटांना आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने आपल्याकडे मागविले नाही. नोटबंदी झाल्यानंतर चार दिवस जिल्हा मध्यवर्ती बँकाकडे मोठ्या प्रमाणात नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकात नोटा बदलल्या जाऊ शकतात असा संशय आल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये नोटा स्वीकारू नका असे आदेश देण्यात आले. त्यानंतर पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकाना सदर नोटा घेण्याची परवनागी देण्यात आली. परंतु घेतलेल्या या नोटा अद्याप रिझर्व्ह बँकेने आपल्याकडे मागविल्या नाही. नोटबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला, समान्यांना खस्त्या खाव्या लागल्या. अनेकांचे बळी गेले. परंतु नोटबंदी ज्या उद्देशातून करण्यात आली तो उद्देश शंभर टक्के साध्य झाला नाही. समाजकंटकांचे व भ्रष्ट्राचाऱ्यांचे पैसे बदलण्याचे अनेक पर्याय सरकारने खुले करून ठेवले होते. त्या पर्यायाचा वापर करून पैसे बदलण्यात आले. परंतु शेतकऱ्यांचे खाते ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते त्या बँकावर कधी बंंदी कधी सुरू ठेवून हवी असलेली रक्कम शेतकऱ्यांना बदलवित आली नाही. आता जिल्ह मध्यवर्ती बँकेकडे असलेले पैसे रिझर्व्ह बँकेने स्वीकारले नाही. त्यामुळे ही रक्कम पडून आहे. नवऱ्याच्या भितीपोटी अनेक महिलांनी जून्या नोटा दाबून ठेवल्या होत्या.