१६४ कामे प्रतीपथावर : ७३१ कामे सुरू करण्याचे आदेश गोंदिया : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात येणारे काम संथगतीने करण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्यात मंजूर कामांपैकी आठ महिन्यात २५३ ( ९.५८ टक्के) काम पूर्ण करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्यात (सन २०१६-१७) मध्ये विविध विभागाच्या प्रस्तावित ३०५९ कामांपैकी २७२९ कामांचा आर्थिक संकल्प तयार करण्यात आला. प्रस्तावित कामांवर ९ कोटी सहा लाख ३६ हजार खर्च होणार आहेत. अभियानांतर्गत दुसऱ्या टप्यात जिल्ह्याच्या ७७ गावांची निवड करण्यात आली आहे. यात कृषी विभागाच्या प्रस्तावित १८४९ कामांपैकी १५३६, जि.प. लघु सिंचन विभागाचे १५३ पैकी ६१, पंचायत समितीच्या ३९५ पैकी ३९५, लघु सिंचन विभागाच्या (पाणी) २८ पैकी १७ व वन विभागाच्या ६३४ पैकी ६३१ कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. बॉक्स ७३१ कामांना कार्यारंभाचे आदेश मंजूर कामांपैकी ७३१ कामांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले.यात कृषी विभागाची सर्व १५४ कामे सुरू करण्यात आली. यातील १३६ कामे पूर्ण झाली आहेत. तर १८ कामे प्रगतीपथावर आहेत. जि.प. लघु सिंचन विभागाच्या ३५ पैकी ३० कामे सुरू आहेत. पंचायत समितीच्या ३९५ कामांपैकी ८७ कामे सुरू करण्यात आली असून ५३ काम पुर्ण झाली आहेत. तर ३४ काम प्रगती पथावर आहेत. वन विभागाची सर्व १४६ कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरीत कामे लवकरच सुरू होणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
जलयुक्तची २५३ कामे केली पूर्ण
By admin | Updated: December 25, 2016 02:06 IST