शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांना २५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 01:50 IST

येथील चंद्रशेखर वॉर्डातील रहिवासी सुरेश शालीकराम दुरूगकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती अपूर्ण व अर्धवट पुरविण्यात आली.

अपूर्ण व अर्धवट माहिती : राज्य माहिती आयोगाचा दणकागोंदिया : येथील चंद्रशेखर वॉर्डातील रहिवासी सुरेश शालीकराम दुरूगकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती अपूर्ण व अर्धवट पुरविण्यात आली. त्याबाबत त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात तक्रार दाखल केली. मात्र जनमाहिती अधिकारी तथा उपअधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय व प्रथम अपिलिय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हे सुनावनीच्या वेळी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने राज्य माहिती आयोगाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्ते दुरूगकर यांच्या तक्रारीच्या सुनावणीप्रसंगी जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलिय अधिकारी दोन्ही अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. दुसऱ्या वेळी जनमाहिती अधिकारी जी.डी. किरीमकर उपस्थित होते तर प्रथम अपिलिय अधिकारी अनुपस्थित होते. यात तक्रारर्त्याची अपिल मंजूर करून आठ दिवसात विनामूल्य उर्वरित माहिती पुरविण्याचे आदेश देण्यात आले. तर प्रथम अपिलिय अधिकारी यांना ३० दिवसांत अनुपस्थितीबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले. माहिती पुरविण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत, असे कारण नमूद करून दुरूगकर यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने आदेश दिल्यावरही संपूर्ण माहिती जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलिय अधिकारी यांनी न पुरविल्याने कारवाई व नुकसान भरपाईची मागणी दुरूगकर यांनी केली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान प्रथम अपिलिय अधिकारी तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांना हजर राहून युक्तीवादाची संधी देण्यात आली. मात्र ते तब्बल सात वेळा अनुपस्थित राहीले. अपिलार्थीस झालेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी २५ हजार रूपयांची नुकसानभरपाई जबाबदार अधिकारी यांच्या वेतनातून अदा करावी व त्याची प्रत आयोगास पाठवावी. यात जबाबदार अधिकाऱ्यांची नावे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी ठरवावे. याशिवाय अपिलार्थीस न मिळालेली माहिती त्वरित विनामूल्य द्यावी व त्याची प्रत आयोगास पाठवावी. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करून त्याचा अहवाल ३० दिवसांत आयोगास सादर करावा, असा आदेश राज्य माहिती आयोगाने दिला आहे.(प्रतिनिधी)