शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

२५ ई-रिक्षा धावतात रस्त्यावर

By admin | Updated: August 28, 2016 01:00 IST

महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत

नरेश रहिले  गोंदियामहाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात सर्रास धावताहेत. अशाच दोन रिक्षांना परिवहन विभागाने पकडले असून अन्य रिक्षांवरही कारवाई केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती आहे.बॅटरीवर चालणारे ई-रिक्षा दिल्लीत प्रकरणाने गाजले. त्यानंतरही महाराष्ट्रात या ई-रिक्षाला बंदी होती. मात्र प्रायोगिक तत्त्वावर नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती या ठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात आले. परंतु हे ठिकाण वगळले तर अख्या महाराष्ट्रात ई-रिक्षाला बंदी असताना गोंदिया व तिरोडा येथे ई-रिक्षा विक्रीची दुकाने थाटून हे वाहन विक्री केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला २५ ई-रिक्षा धावत असल्याची माहिती परिवहन विभागामार्फत मिळाली. राज्य शासनाची या ई-रिक्षांना मंजूरी नाही, त्यांची नोंदणी झाली नसून क्रमांक नसताना रस्त्यावर बिनधास्तपणे हे वाहन चालविले जात आहे. या वाहनचालकांनी अपघात करून वाहन पळवून नेले तर त्यांना शोधणे अत्यंत कठीण होणार आहे. अनाधिकृतपणे हे रिक्षा जिल्ह्यातील रस्त्यांवर बिनधास्तपणे धावत आहेत. यावर कारवाई होणार आहे. असेच रस्त्यावर विनाक्रमांक धावणाऱ्या दोन रिक्क्षांना गोंदिया व तिरोडात जप्त करण्यात आले आहे. परिवहन विभागाची पोलिसांत तक्रारबंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात धावत असल्याने दोन ईरिक्षावर कारवाई करून एक वाहन तिरोडा पोलीस ठाण्यात तर दुसरे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या त्या वाहनांना सोडण्यासाठी नागपूर येथून परिवहन विभागाचे कर्मचारी मांडवेकर यांना मंगळवारी फोन आला होता. ते वाहन न सोडल्यास तुम्हाला व तुमच्या अधिकाऱ्यांना ठार करू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार परिवहन विभागाने शहर पाोलिसांकडे केली आहे. ई-रिक्षावर गोंदियात बंदी असताना अनाधिकृतपणे कुणीही ई-रिक्षा खरेदी करू नये अन्यथा तुमचे नुकसान होईल. नोंदणी होत नसलेली वाहने रस्त्यावर चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. ई-रिक्षाला बंदी असल्यामुळे नागरिकांनी स्वत:चे आर्थिक नुकसान करू नये.-विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया.