शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोशन झालेल्या २४९ पोलिसांचे १२ दिवसातच झाले डिमोशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात २ हजारावर असलेल्या पोलिसांपैकी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची वेळ आली असतांनाही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. शासनाने पत्र काढून खुल्या प्रवर्गातील जे नियमात बसत असतील अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे पत्र काढले. त्या पत्राच्या अनुषंगाने गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी खुल्या प्रवर्गाबरोबरच आरक्षण प्रवर्गातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती देऊन टाकली. त्यांना लगेच सोडून त्यांची बदली करण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रकार : आरक्षणातील पोलिसांना खुल्या प्रवर्गात पदोन्नती, बारा दिवसच राहिला कर्मचाऱ्यांना आनंद

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्याच्या सूचना दिल्या. परंतु गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांमधील आरक्षणातील पोलिसांना खुल्या प्रवर्गात पदोन्नती देण्यात आली. नियमाच्या बाहेर जाऊन ही पदोन्नती करण्यात आल्याने आपण अडचणीत येऊ नये म्हणून पोलीस अधीक्षकांनी पदोन्नती (प्रमोशन) केलेल्या २४९ कर्मचाऱ्यांना पुन्हा पदावनत (डिमोशन) केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील २४९ कर्मचाऱ्यांना पदावनत केल्याचे पत्र २२ एप्रिल रोजी काढले आहे.गोंदिया जिल्ह्यात २ हजारावर असलेल्या पोलिसांपैकी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची वेळ आली असतांनाही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. शासनाने पत्र काढून खुल्या प्रवर्गातील जे नियमात बसत असतील अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे पत्र काढले. त्या पत्राच्या अनुषंगाने गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी खुल्या प्रवर्गाबरोबरच आरक्षण प्रवर्गातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती देऊन टाकली. त्यांना लगेच सोडून त्यांची बदली करण्यात आली. परंतु दिलेली पदोन्नती त्यांनी पुन्हा रद्द करून त्या २४९ पोलीस कर्मचाऱ्यांना पदावनत केले आहे. त्यामुळे आपल्या संसाराचे बिऱ्हाड घेऊन बदलीच्या ठिकाणी गेलेल्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे.  गोंदिया  पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २१ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून २६ मार्च रोजी पदोन्नती देण्यात आली. पोलीस नायक असलेल्या ८७ कर्मचाऱ्यांना पोलीस हवालदार म्हणून ८ एप्रिल रोजी पदोन्नती देण्यात आली,  तर १४१ पोलीस शिपायांना १० एप्रिल रोजी पोलीस नायक शिपाई म्हणून पदोन्नती देण्यात आली. परंतु देण्यात आलेल्या पदोन्नती नियमाला धरून नसल्याने आपण कधीतरी अडचणीत येऊ, या धास्तीपायी २४९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती २२ एप्रिल रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला असता तो हाेवू शकला नाही. 

याचिका न्यायालयात असतानाही दिली होती पदोन्नतीपदोन्नतीत आरक्षण असू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सन २०१५ मध्ये याचिका टाकण्यात आली होती. परंतु ही याचिका न्यायप्रविष्ठ असतानाही गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांनी यापूर्वी पदोन्नती दिली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना पदोन्नतीत आरक्षण नाही, असे ठरविल्यावर सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब मान्य केली आहे. 

कोविडचा संसर्ग, कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास व शासनाला भुर्दंडगोंदिया पोलीस अधीक्षकांनी २४९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. आरक्षणात लागलेल्या कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गातून पदोन्नती दिली आणि पदोन्नती केलेल्या कर्मचाऱ्यांची बदलीही केली. त्यामुळे या कोविडच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोविडचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. जे कर्मचारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले त्यांना मानसिक त्रास झाला आणि या बदलीचा शासनावर भुर्दंडही बसला आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिस