शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

२३२ बालमजूरांसाठी ७ विशेष प्रशिक्षण केंद्र्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2017 01:22 IST

बालपण मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण देणार्े असते. कसलीही चिंता, कसलीही जबाबदारी राहत नाही.

शिष्यवृत्ती वाढवा : ११ वर्षात १६२१ बालमजूर मुख्य प्रवाहात नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालपण मनुष्याच्या जीवनात आनंदाचे क्षण देणार्े असते. कसलीही चिंता, कसलीही जबाबदारी राहत नाही. आपल्याच धुंदीत राहणाऱ्या बालकांवर एकाएक पोटासाठी धोक्याच्या ठिकाणीही काम करून पोटाची खळगी भरण्याची पाळी येत असेल तर यापेक्षा दुर्देव नाही. गोंदिया जिल्ह्यात बालमजूरी करणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने मागील ११ वर्ष केलेल्या प्रयत्नांमुळे १६२१ बालकांना मुख्या प्रवाहात आणण्यात आले. तर २३२ बाल मजूृरांसाठी ७ नविन विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, भीक मागणारे बालक आहेत. आई-वडीलांच्या दुर्लक्षामुळे मांग गारुडी, नाथजोगी, मुस्लीम फकीर यांची मुले बालमजूरीकडे वळतात. या बालमजूरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १२ प्रशिक्षण केंद्र आहेत. यात ३८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोंदिया तालुक्याच्या गौतमनगर, संजय नगर, कुडवा, गोंडीटोला व अदासी, सालेकसा तालुक्यातील बाबाटोली, मुरकुडोहदंडारी व तिरोडा तालुक्याच्या काचेवानी, नवरगाव, मुंडीकोटा व घोघरा येथे प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत.गोंदिया जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात २३२ बालमजूर असल्याचे लक्षात आले. त्यांच्यासाठी ७ नविन विशेष प्रशिक्षण केंद्र उघडले जाणार आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या १४ ते १८ वर्षातील बाल मजूरांना व्यावसायिक प्रशिक्षण, जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उज्वल लोयासहायक कामगार आयुक्त गोंदिया२२०० बालकामगारांना पकडले बाल कामगार कार्यालयाद्वारे सन २००६ पासून आतापर्यंत २२०० बाल कामगारांना पकडण्यात आले. यात १६२१ बाल कामगार प्रकल्प समितीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यात आले. त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नियमीत शाळेत पाठविले जात आहे. यातील बहुतांश बालके आपल्या पायावर उभे झाले आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत.फक्त १५० रूपये शिष्यवृत्तीबाल मजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात. सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला १५० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे. बालमजूरीसाठी आईवडीलही तेवढेच जबाबदार आहेत. आई वडीलांच्या व्यसनामुळे बालमजूरी फोफावत आहे.