शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२३१ मुले शाळाबाह्य

By admin | Updated: July 8, 2015 01:38 IST

शाळाबाह्य मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाकडून शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सर्वत्र सर्वेक्षण : १६५ मुलांनी पाहिले नाही अजून शाळेचे तोंडगोंदिया : शाळाबाह्य मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाकडून शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यात २३१ मुले-मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यांना नियमित शाळेत जाण्यासाठी आता नियोजन केले जाणार आहे.जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार २८४ कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी १० हजार ४३४ व्यक्ती सहभागी झाले होते. त्यात शिक्षकांसह इतर विभागांचे कर्मचारी आणि कधीच शाळेत न गेलेल्या तसेच मध्येच शाळा सोडलेल्या बालकांचे व सतत ३० दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येकाच्या घरी, बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक व शेतात जाऊन हे सर्वेक्षण करायचे होते. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांनी फक्त घरोघरी जाऊनच सर्व्हेक्षण केले. शेतात, बाजारात, रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकात सर्वेक्षण करण्याचा प्रकार क्वचितच काही ठिकाणी घडला.आमगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ७४ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ७७ बालके शाळाबाह्य आढळली. विशेष म्हणजे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकही मुलगा शाळाबाह्य आढळला नाही. देवरी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली १० बालके, मध्येच शाळा सोडलेली ७ बालके असे १७ बालके शाळाबाह्य आढळली. गोंदिया तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ४८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ३२ बालके असे ८० बालके शाळाबाह्य आढळली. गोरेगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेला १ बालक, मध्येच शाळा सोडलेली ३ बालके असे ४ बालके शाळाबाह्य आढळली. सडक-अर्जुनी तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली ८ बालके, मध्येच शाळा सोडलेली ८ बालके असे १६ बालके शाळाबाह्य आढळली. सालेकसा मध्येच शाळा सोडलेली १ मुलगी शाळाबाह्य आढळली. तिरोडा तालुक्यात कधीच शाळेत न गेलेली २४ बालके, मध्येच शाळा सोडलेली १२ बालके असे ३६ बालके शाळाबाह्य आढळली. गोंदिया जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेली १६५ बालके, मध्येच शाळा सोडलेली ६६ बालके असे एकूण २३१ बालके शाळाबाह्य आढळली. या सर्वेक्षणात शाळाबाह्य आढळलेल्या या बालकांचे आधार कार्ड काढून दिले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)सर्वेक्षणात स्वयंसेवी संस्थांचाही सहभागया सर्वेक्षणाच्या कामात शिक्षक, आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, माविमचे अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्थ असलेले कर्मचारी यांनी सहकार्य घेतला.अर्जुनी-मोरगावात खरेच झाले का सर्वेक्षण?अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शाळाबाह्य मुले नाहीच, असे म्हटले तर ही बाब तेथील सामाजिकतेच्या गौरवाची बाब आहे. येथे कुणीही बालक शिक्षणापासून वंचित नाही. परंतु खरंच या तालुक्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण प्रामाणिकपणे झाले का? असा प्रश्न उपस्थित होतो. या तालुक्यात भटकंती करणारे लोक नाहीत का? भिकारी नाही का? शाळा सोडून घरी राहणारे किंवा कधीच शाळेत गेले नाही असा एकही बालक या तालुक्यात आढळला नाही. त्यामुळे या तालुक्यात सर्वेक्षण किती प्रामाणिकपणे झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.