शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 21:15 IST

समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्दे१ कोटी २५ लाख रुपयांचे वाटप : तंटामुक्तीने लावलेल्या विवाहांची नोंद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाजातील सामाजिक विषमता नष्ट व्हावी, जातीभेदाचे उच्चाटन व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून केले जात आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाने ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचे ठरविले आहे. सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात जिल्ह्यात २२५ आंतरजातीय विवाह झाले आहेत.आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाने ५० हजार रूपये आर्थिक मदत देण्याची योजना सुरू केली आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहान दिले जात नव्हते. मात्र महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आणली तेव्हापासून या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. गावा-गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आपापल्या गावातील प्रेमीयुगुलांचे शुभमंगल लावून दिले. यात आंतरजातीय विवाह करणारे जोडपी अनेक आहेत. परंतु सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाºया योजनेच्या लाभासंदर्भात त्यांना माहीती नसल्यामुळे ते यापासून वंचित राहत आहेत.आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या पैकी असावा तर दुसरा स्वर्ण हिंदू, जैन, लिंगायत किंवा शिख धर्मीय असवा. मागासवर्गीयांमध्ये आंतरप्रवर्गात विवाह झाला असेल तर या विवाहातील जोडप्यांना संयुक्त नावाने ५० हजार रूपयाचा धनादेश देण्यात येतो.सन २०१४-१५ ते २०१६-१७ या तीन वर्षात आंतरजातिय विवाह करणाऱ्या २२५ जोडप्यांना लाभ देण्यात आला. १ कोटी २५ लाख ३५ हजार रूपयांचा लाभ देऊन समाजात सामाजिक समता नांदण्यास मदत करण्यात आली.गावात जातीय सलोखा यशस्वीमहाराष्टÑ शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली. तंटामुक्त चळवळीने ग्रामीण भागात अनेक समाजोपयोगी कामे केली. इतकेच नव्हे तर गावातील भांडण तंटे मिटवून गावात जातीय सलोखा कायम राखण्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना यश आले. आंतरजातीय विवाह होणे गावात अवघड असते. यातच आंतरजातीय विवाह झाले तर वर किंवा वधूच्या जीवाला कुटुंबियांकडून धोका असतो. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन जातीय सलोखा कायम राखला.त्या जोडप्यांना लाभ द्यामहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अमंलात आली. तेव्हापासून प्रेमीयुगुलांना साथ मिळाली. आंतरजातीय विवाहाला मुला-मुलीकडील कुटुंबियांचा विरोध असला तरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या मदतीने त्या जोडप्यांचे शुभमंगल लावून दिले जाते. परंतु त्या लग्नातील जोडप्यांना लाभ मिळावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेत नाही. किंवा लग्न करणाºया जोडप्यांना यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्यामुळे ते अर्जच करू शकत नाही. परिणामी ते या लाभापासून वंचीत राहतात.