शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

करडीत २२ कामांतून २२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

By admin | Updated: July 24, 2016 00:02 IST

करडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुका कृषी विभाग व पंचायत समिती मोहाडी, जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा

जलयुक्त शिवार योजना : चार विभागांची ९४ लाखांची कामे, शेतकऱ्यांत चैतन्याची बहार युवराज गोमासे करडी (पालोरा) करडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुका कृषी विभाग व पंचायत समिती मोहाडी, जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग भंडारा व वनविभाग तुमसरच्या वतीने अंदाजपत्रकीय ९४.०४ लाखांची एकुण २२ कामे करण्यात आली. कामांमुळे २२०.३१ टिएमसी पाण्याची साठवणूक होवून २२१.७१ हेक्टर आर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. करडी गावातील शेतशिवार या कामांमुळे जलयुक्त झाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यात व्यक्त होत आहे. कोका जंगल टेकड्या व वैनगंगा नदी दरम्यान मध्यभागी वसलेला मोहाडी तालुक्यातील करडी गाव कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. गावासभोवती लहान मोठ्या तलावांची व नाल्यांची संख्या अधिक आहे. मात्र तरीही उन्हाळ्यापूर्वीच तलाव कोरडी पडायची. नाल्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट असायचा. शेतकऱ्यांनी विविध योजनांतून विहिरीचे खोदकाम केले. मात्र भूगर्भात कमी जलसाठा असल्याने एक तासही पाणी शेतीला मिळत नव्हते. रिसाळा तलावाचे पाणी गावापर्यंत पाणी पोहचत नव्हते. एका पाण्याने खरीपातील शेती नुकसानग्रस्त व्हायची. पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाणामाऱ्या नेहमीच पहायला मिळायच्या. गाळामुळे तलाव, नाले उथड पडून अतिक्रमण वाढीस लागली होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे परिस्थिती पालटली. शेतशिवारात पाणी दरवळू लागले असून दुष्काळ संपण्यास मदत मिळाली आहे. पाऊस कमी झालेला असताना यावर्षी धानाची पेरणी लवकर होवून तलाव, नाले, बांध बंधाऱ्या शेजारील शेतकऱ्यांनी विविध साधनांनी पाण्याचा उपसा करून रोवणी आटोपली आहेत. तलाव, नाले, बांध, बंधारे, शेततळे, शेतबोळ्या पाण्याने तुडूंब भरल्यानंतर खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी पिकांना पाण्याचा उपयोग होणार असल्याने शेतकऱ्यांत चैतन्याची बहार आली आहे. या कामातून निघालेल्या मातीमुळे गावातील अनेक कामे नि:शुल्क झाली, हे विशेष. पंचायत समिती, मोहाडी मोहाडी पंचायत समितीच्या मग्रारोहयो अंतर्गत पुनर्जीवनाची ४ कामे पूर्ण करण्यात आली. यात महेंद्र नवखरे, प्रकाश तुमसरे, पुरुषोत्तम सेलोकर, दिपक तुमसरे यांच्या शेतावर झालेल्या कामांचा समावेश आहे. या कामांवर अंदाजपत्रकीय सुमारे १.७५ लाख रुपयापैकी १.६३ लाखांचा निधी खर्ची पडला. त्यामुळे सुमारे ४.७२ हेक्टर आर शेती सिंचनाखाली येण्याचा अंदाज आहे. जि.प. लघु पाटबंधारे उपविभाग, भंडारा या विभागामार्फत विकास निधी व महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी अभियानांतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरुस्तीची २ व मामा तलाव दुरुस्तीची १ काम अशी ३ कामे केली गेली. त्यापैकी ३० जून अखेर एका बंधाऱ्याचे काम पूर्ण होवून २ कामे प्रगतीपथावर आहेत. अंदाजपत्रकीय ५०.७४ लाखांची कामे झालीत तर सुमारे ९.७३ लाखांचा निधी आता पर्यंत खर्च झाला. या कामांतून १७४.४६ टीएमसी पाण्याची साठवणूक होण्याचा अंदाज असून १३० हेक्टर शेती ओलीताखाली येण्याची अपेक्षा आहे. वनविभाग, तुमसर तर वनविभाग तुमसर अंतर्गत एक साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून अंदाजपत्रकीय २.९३ लाखांचा निधी खर्च झाला आहे. अशाप्रकारे करडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ४ विभागाची २२ कामे झाल्याचे शिवारात पाणी दरवळू लागले आहे. तालुका कृषी विभाग मोहाडी सन २०१५-१६ या वर्षात करडी गावात कृषी विभाग मोहाडी मार्फत डिपीसी व सिएमआर फंडातून ८ कामे झाली. महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत सिमेंट बांध दुरुस्तीची ३ कामे झालीत. तिन्ही फंडाची कामे पूर्ण झाली आहेत. नरेगा अंतर्गत पुनर्जीवनाच्या तीन कामांना मंजुरी मिळाली. त्यापैकी मजूर न मिळाल्याने २ कामे झाली नाही. तर एक काम अपूर्ण आहे. एमटीएस अंतर्गत ३ शेततळ्याची कामे पूर्ण झालीत. अशा प्रकारे एकूण १४ कामांसाठी अंदाजपत्रकीय ३८.६१ लाख रुपये देण्यात आले. दि. ३० जुलै अखेर ३१.०१ लाखांचा खर्च कामांवर झाला. त्यामुळे सुमारे ८६.९९ हेक्टर आर क्षेत्राच्या सिंचन क्षमतेत भर पडली.