शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२२ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:06 IST

व्यसनमुक्त जिल्ह्याची स्वप्ने पाहणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात आता अवैध दारूचा महापूर वाहात आहे.

ठळक मुद्देअवैध दारूचा महापूर : दारूबंदीसाठी तंमुसची मदत घ्यावी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : व्यसनमुक्त जिल्ह्याची स्वप्ने पाहणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात आता अवैध दारूचा महापूर वाहात आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी अवैध दारू विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण भागातील गावागावात अवैध दारूचा महापूर वाहात असल्याची ओरड आहे. पोलिस विभाग दररोज कारवाई करीत असला तरीही अवैध दारूविक्रेते आपला व्यवसाय त्याच जोमाने चालवित करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत २२ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया आसोली येथील पंचशीला रामेश्वर मेश्राम (५०) हिच्याकडुन ५ लीटर हातभट्टीची दारू, पांढराबोडी येथील केशरी मनोहर डहारे (४९) हिच्याकडुन २ नग देशी दारूचे पव्वे, नवेगावबांध पोलिसांनी जांभळी येथील शामराव चंद्रभान जनबंधू (३५) याच्याकडुन ७ नग देशी दारूचे पव्वे, केशोरी पोलिसांनी येळदा येथील लक्ष्मण दांपत मडावी (४०) याच्याकडुन ५ नग देशीदारूचे पव्वे, गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया संजयनगर पिंडकेपार येथील ध्रुपता तुळशीराम वाढई (६८) हिच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारु, दुर्गा जयप्रकाश बुरडे (४०) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, गंगाझरी येथील राजकुमार सहेषराम शेंडे याच्याकडून ३ लिटर हातभट्टीची दारु, देवरी पोलिसांनी धोबीसराड येथील मोहन दयाराम फुल्लूके (५८) याच्याकडून ३ नग देशी दारुचे पव्वे, डुग्गीपार पोलिसांनी भुसारीटोला येथील श्रीपत सदाराम मोटघरे (६५) याच्याकडून ३ नग देशी दारुचे पव्वे, तिरोडा पोलिसांनी मुंडीकोटा येथील देवीबाई हिंदीमल मोटघरे (५०) हिच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु,शास्त्री वार्ड तिरोडा येथील पंचफुला दुधराम राऊत (४५) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारु, आमगाव पोलिसांनी मरारटोला बकरामुंडी येथील महेंद्र बुधराम रामटेके (५२) याच्याकडून १४ नग देशी दारुचे पव्वे, रामनगर पोलिसांनी आंबेडकर चौक गोंदिया येथील सुखचंद सुरजलाल हट्टेवार (४७) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, इंदिरानगर कुडवा येथील किरण सुरज बावनथडे (४५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, रावणवाडी पोलिसांनी सावरी येथील भारती खुशरंग मंडये (३०) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, सत्यप्रकाश बसंतराय भगत (२४) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, गोरेगाव पोलिसांनी कुºहाडी येथील देवाजी दौलत सेऊतकर (६७) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारु, दवनीवाडा पोलिसांनी पिपरिया येथील माणिक भाऊलाल देवगडे (२८) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारु, तिरोडा पोलिसांनी करडी बुज. येथील अशोक उर्फ प्रशांत भास्कर मेश्राम (४०) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, चिचगड पोलिसांनी रामगड सुकडी येथील थानीराम शिवपाल बोरकर (३५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, अर्जुनी मोरगाव पोलिसांनी माहुरकुडा येथील राजकुमार खेमराज वंजारी (४३) याच्याकडून ६ नग देशी दारुचे पव्वे, सालेकसा पोलिसांनी निंबा येथील मनोज राधेश्याम भगत (२८) याच्याकडून ६ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोंपीविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.