शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२२९ गावे ‘निर्मल गाव’ योजनेपासून दूर

By admin | Updated: October 18, 2014 01:38 IST

गावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले.

नरेश रहिले गोंदियागावातीलच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावातील घाण, केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंमलात आणले. गावखेड्यात गावातील रस्त्यावर मानवी विष्ठेची दुर्गंधी नेहमीच पहायला दिसत असल्यामुळे शासनाने निर्मल ग्रामची संकल्पना अंमलात आणली. या निर्मल ग्राम मोहीमेत सहा वर्षात जिल्ह्यातील ३३७ गावे निर्मल ग्राम झाली आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेत अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. मात्र निर्मल ग्राम योजनेला आठ वर्षाचा काळ झाला असताना अद्याप २२९ गावे अजूनही निर्मल ग्राम योजनेपासून अलिप्त आहेत. गोंदिया तालुक्यात एकूण १०८ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २४ गावे, सन २००७-०८ या वर्षात ५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. आमगाव तालुक्यात एकूण ६४ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात १० गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ८ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. तिरोडा तालुक्यात एकूण ९५ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १५ गावे, सन २००८-०९ या वर्षात ४ गावे, सन २००९-१० या वर्षात ४ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. सालेकसा तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात एकही गाव नाही, सन २००६-०७ या वर्षात १३ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात निरंक, सन २००९-१० या वर्षात १ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. देवरी तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ६ गावे, सन २००६-०७ या वर्षात १७ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ या वर्षात ३ गावे, सन २००९-१० या वर्षात ३ गावे, सन २०१०-११ या वर्षात २ गाव निर्मल झाली. सडक/अर्जुनी तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २६ गावे, सन २००७-०८ या वर्षात १२ गावे, सन २००८-०९ , सन २००९-१०, सन २०१०-११ या तीन वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही.अर्जुनी/मोरगाव तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ३ गावे, सन २००६-०७ या वर्षात २१ गावे, सन २००७-०८ या वर्षात ९ गावे, सन २००८-०९ या वर्षात २ गावे, सन २००९-१० या वर्षात ५ गावे, सन २०१०-११ या वर्षात एकही गाव निर्मल होऊ शकला नाही. गोरेगाव तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील सन २००५-०६ यावर्षात ४ गावे, सन २००६-०७ या वर्षात २२ गावे, सन २००७-०८ या वर्षात ८ गावे, सन २००८-०९, सन २००९-१० व सन २०१०-११ या तीन्ही वर्षात एकही गाव निर्मल नाही. जिल्ह्यातील ५५६ पैकी पहिल्या वर्षी ३१ गावे, दुसऱ्या वर्षी १७१, गावे तिसऱ्या वर्षी ८० गावे, चौथ्या वर्षी १७ गावे, पाचव्या वर्षी २६ गावे तर सहाव्या वर्षी २ गावे निर्मल ग्राम ठरली. जिल्ह्यातील २२९ गावे निर्मल ग्राम पुरस्कारापासून अलिप्त आहे. सन २०११-१२ या वर्षात निर्मल ग्राम स्पर्धेत असलेल्या गावांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाने निरीक्षणही केले. मात्र केंद्र शासनाने या प्रस्तावावर विचारच केला नाही. त्यामुळे सन २०११-१२ या वर्षातील पुरस्कारच घोषित केलेले नाहीत.