देवानंद शहारे - गोंदियावीज चोरीची प्रकरणे जिल्ह्यात वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी भरारी पथकाकडून वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. मात्र तरीही वीज चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सध्याच्या परिस्थितीत २१.४२ टक्के वीज गळती होत आहे.जिल्ह्यात ११ केव्हीच्या एकूण ८६ विद्युत वाहिन्या आहेत. यापैकी १९ वाहिन्यांवरून ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वीज हानी होत असून सरासरी २१.४२ टक्के वार्षिक वीज चोरी होत आहे. त्यामुळे या वाहिन्यांवरील वीज ग्राहकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे.जिल्ह्यात एकूण दोन लाख ३७ हजार वीज ग्राहक आहेत. यापैकी २० हजार ४८५ विद्युत कृषी पंपधारक आहेत. डीएससी गृप ए, बी, सी व डी मधील वीज हानी ४२ टक्क्यांपेक्षा खाली असल्याने त्या वाहिन्या लोडशेडींग फ्री आहेत. तर ई, एफ व जी मधील १९ वाहिन्यांवरून ५० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक वीज हानी होत असल्याने तुट भरून काढण्यासाठी त्या वाहिन्यांवरून सर्वाधिक भारनियमन केले जाते. विद्युत कृषी पंपधारकांना व घरगुती वीज मीटर धारकांना अनुदानाने विद्युत पुरवठा केला जातो. ग्राहकांना ५.३० रूपये प्रतियुनिट वीज पुरवठा केला जातो. परंतु वीज चोरीची सरासरी लक्षात घेतल्यास विद्युत विभागाला केवळ २.५० रूपये प्रतियुनिट मिळतात. वीज चोरीच्या प्रकारामुळे विद्युत वितरण विभागाला जवळपास अर्धेअधिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यात २१.४२ टक्के वीज चोरी
By admin | Updated: November 13, 2014 23:04 IST