शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरमध्ये २१०० झाडे

By admin | Updated: October 13, 2016 01:54 IST

शेती हा पोटापाण्याचा धंदा नसून तो एक राष्ट्रीय व्यवसाय आहे. शेतीची उत्पादकता वाढली तर देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढेल,

पाच लाखांचे उत्पादन : विहीरगावच्या शेतकऱ्याने फुलविली केळीची बागबोंडगावदेवी : शेती हा पोटापाण्याचा धंदा नसून तो एक राष्ट्रीय व्यवसाय आहे. शेतीची उत्पादकता वाढली तर देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढेल, असा महत्वाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषी धोरणाबाबत मांडले. शेती हा एक उद्योग आहे असे मनामध्ये बिंबवून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका छोट्याशा विहीरगाव या खेड्यातील विश्वनाथ वालदे या अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने आपल्या पत्नीच्या साथीने तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून नगदी पिकांची लागवड करण्याचा नाविण्य उपक्रम राबवित आहे. दीड एकर शेतीमध्ये केळींची लागवड केली आहे. मनमोहक फुललेली केळीची बाग मोठ्या दिमाखाने उभी असल्याचे दिसून येत आहे. विहीरगाव (बर्ड्या) येथील विश्वनाथ वालदे यांच्याकडे सामूहिक जवळपास साडेचार एकर शेतजमीन आहे. दहावीपर्यंत शिक्षित असलेले विश्वनाथ वालदे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वेळोवेळी सानिध्यात राहून त्यांच्या मार्गदर्शनातूनच तंत्रशुद्ध पद्धतीने नवनवीन पिके घेण्याचा विक्रम करतात. एकूण जमिनीपैकी दीड एकरामध्ये केळीची लागवड १५ आॅक्टोबर २०१५ रोजी केली होती. जीनायन टीशू कल्चर जैन या जातीचे २०५० केळीच्या झाटांची लागवड केली होती. दोन सऱ्यातील अंतर साडे पाच फूट अंतराने रोपे लावण्यात आलेली आहेत. या झाडांपैकी २१०० झाडे आज घडीला केळांच्या घडांनी बहरलेली दिसून येत आहे. केळीच्या बागेची मशागत विश्वनाथ, त्यांची पत्नी कलीता, मुलगा दुष्यांत स्वत: वेळी-अवेळी करतात. तब्बल एक वर्षाने बागेतील केळींचे उत्पादन निघणे सुरू झाले. झाडाला लागलेला एक घड सरासरी २२ किलोचा असल्याचे विश्वनाथ वालदे यांनी सांगितले. लागलेल्या केळी विक्रीस योग्य असल्याने त्यांनी छत्तीसगडमधील भिलाई येथील एका व्यापाऱ्याशी सौदा पक्का झाल्याचे सांगितले. प्रतिकिलो १२ रुपयेप्रमाणे शेतामधून उचलण्याचा भाव ठरला. बागेतील २१०० झाडांवरील केळांच्या विक्रीमधून ५ लाख ५४ हजार ४०० रुपये अपेक्षित आहेत. केळींचे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर १ लाख ३६ हजार ५०० रुपयाचा खर्च झाल्याचे त्या युवा शेतकऱ्याने सांगितले. केळीची बाग फुलविण्यासाठी एकूण खर्च वजा जाता शुद्ध नफा ४ लाखाच्यावर मिळेल, असा आशावाद त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केला. तीन वर्ष केळीच्या बागेतून उत्पन्न मिळणार आहे. शेतीकडे व्यवसाय या दृष्टीकोणातून पाहिल्यास निश्चितपणे शेती फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)- ठिंबक सिंचनाचा उपयोगविश्वनाथ वालदे या युवा शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या यशस्वी मार्गदर्शनाने ठिंबक सिंचनाची सोय शेतीमध्ये केली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून शेतीमध्ये ओलीताची सोय केली जाते. अल्प प्रमाणात शेती असूनसुद्धा त्यांनी विविध पिके घेण्यासाठी त्यांची संघर्षमय तळमळ वाखाण्यासारखी आहे. दोघेही पती-पत्नी व साथीला मुलगा शेती हाच आपला व्यवसाय समजून घाम गाळतात. दिवस-रात्र मेहनत घेतात. शेतात डौलाने पीक उभे राहते. परंतु वन्यप्राण्यांचा होणारा उपद्रव हाच आर्थिक नुकसानीस कारणीभूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादनगेल्या काही वर्षापूर्वी १० आर जागेत विश्वनाथ वालदे यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने शेडनेट उभे केले. यातून कारले, शिमला मिरची, वांगे आदी विविध पिके घेणे सुरू आहे. शेडनेटच्या माध्यमातून पिकांची वाढ होवून भरघोष उत्पादन होत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध उत्पादन घेण्याचा माणसविश्वनाथ वालदे यांच्याकडे असलेल्या साडेचार एकर शेतीमध्ये विविध पिके घेण्याचा त्यांचा माणस आहे. मागील वेळी त्यांनी टरबूजसुद्धा लावले होते. आजघडीला केळीच्या बागेसह, अर्धा एकरात टमाटर, भाताची लागवड केली आहे. चवळीच्या शेंगा, मेथी, पालक यासारखे पिकांचे उत्पादन घेतले. पॅक हाऊसची गरजकृषी विभागाच्या सल्ल्याने वेळोवेळी नवनवीन पिकांचे उत्पादन घेणारे विश्वनाथ वालदे यांनी पॅक हाऊस अति गरजेचे असल्याचे सांगितले. अनेकदा पिके तोडून ठेवल्यावर व्यापारी काही कारणास्तव मालाची उचल करीत नाही. अशावेळी तोडलेला माल ठेवण्यासाठी पॅक हाऊस आवश्यक असल्याने विश्वनाथ व पत्नी कलीता या युवा शेतकऱ्यांनी ते जोडण्याचे मत व्यक्त केले आहे.