शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक करणारे २१ ट्रक पकडले

By admin | Updated: July 28, 2016 00:10 IST

जिल्ह्यातील विविध रेतीघाटातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या २० ट्रक आणि एक ट्रॅक्टरसह

तहसीलदारांची कारवाई : पोलीस मुख्यालयात वाहने जमा भंडारा : जिल्ह्यातील विविध रेतीघाटातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या २० ट्रक आणि एक ट्रॅक्टरसह अशी २१ वाहने मंगळवारला जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संयुक्त पथकाने केली. जप्त करण्यात ट्रकांमधून सुमारे शंभर ब्रास रेती नागपूरकडे वाहून नेणे सुरू होते. भंडारा परिसरातील रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती सोमवारला रात्री महसुल विभागाला मिळाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी आणि तहसीलदार सुशांत बनसोड यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने कारवाई सुरू केली. दरम्यान सोमवारला तीन ट्रक आणि एक ट्रॅक्टरला पकडण्यात आले. मंगळवारला ही मोहीम तीव्र करण्यात आली. त्यात १७ ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेत असल्यामुळे कारवाई करण्यात आली. माहितीनुसार, प्रत्येक ट्रकमध्ये चार ते पाच ब्रास रेती दिसून आली. बहुतांश ट्रक टीपीविना आणि क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक करणारे आढळून आले. हे ट्रक भंडारा शहर, राष्ट्रीय महामार्गावरील बेला आणि शहापूरजवळ तैनात पथकांनी पकडले. सर्वच ट्रक चालकावर प्रति ब्रास १०,४०० रूपये याप्रमाणे दंड ठोठावण्यात आला. या रेतीची किंमत २.४० लाख असून दंडाची रक्कम १० इतकी आहे. आतापर्यंत चार ट्रक मालकांकडून १ लाख ३५,४०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. हे सर्व २१ ही ट्रक पोलीस मुख्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)