लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी बुध्द पोर्णिमेला नागझिरा-नवेगावबांध संरक्षित जंगलात प्राणी गणना केली जाते. यावर्षी सुध्दा १८ मे रोजी वन्यजीव, वन विभाग आणि सेवा संस्थेच्या संयुक्तपणे २१ मचणावरुन प्राणी गणना करण्यात आली.सेवा संस्था नागझिरा-नवेगाव कॅरिडोर व बफर क्षेत्रामध्ये सलग १० ते १२ वर्षांपासून वन्यजीव संरक्षण करीता लोकसहभागातून कार्य करीत आहे. यंदाही २१ मचाणावरून पाणवठ्यावर निरीक्षण करुन वन्यजीवांची गणना आणि निसर्गनुभव हा उपक्रम राबविण्यात आला. जांभळी १, जांभळी २, तसेच प्रादेशिक वनक्षेत्रातील सडक अर्जुनी, गोरेगाव, व उत्तर देवरी असे वनपरिक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र वन्यप्राण्यांच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. प्राणी गणना म्हटले की सर्वांचे लक्ष अभयारण्याकडे जाते. बफर क्षेत्राकडे सर्वच दुर्लक्ष करतात. त्यामुळे सेवा संस्थेने हीच बाब हेरुन मागील पाच सहा वर्षांपासून बफर क्षेत्रात प्राणी गणना आणि निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवित आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत कर्मचारी आणि स्वंयसेवकांना सुध्दा प्रोत्साहान मिळते.१८ मे रोजी जांभळी वनपरिक्षेत्र कार्यालयात सर्व सेवा संस्थेचे स्वयंसेवी व वन कर्मचारी एकत्र आले. त्यानंतर त्यांना मचाण उपलब्ध करुन देण्यात आले. एका मचाणावर १ ते २ स्वयंसेवी व १ ते २ वनकर्मचारी असा समावेश होता. संपूर्ण कॅरिडोरमध्ये जांभळी १ व जांभळी २ वनपरिक्षेत्रात १२ मचाण, प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील उत्तर देवरीमध्ये ४ मचाणे, सडक अर्जुनीमध्ये ३ मचाण व गोरेगावमध्ये २ मचाण असे जवळपास २१ मचाणावर सेवा संस्थेचे स्वयंसेवीनी बसून निसर्गानुभव घेवून प्रगणनेत सहभाग घेतला. यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा सहकार्य केले.यांचा सहभाग महत्त्वपूर्णप्रगणनेकरिता सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, मुरदोली रोपवाटीकेच्या दिव्या भरती, वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे , गोवर्धन राठोड , जाधव,लांबट, सेवा संस्थेचे चेतन जसानी शशांक लाडेकर,दुष्यंत आकरे, अंकित ठाकूर, कन्हैया उदापूरे, भाग्यश्री बहेकार, पवन सोयाम, नदीम खान, बंटी शर्मा, नितीन भदाडे,गौरव मटाले, पराग जीवानी, प्रतीक बोहरे, सुशील बहेकार, तरु ण ओझा, विकास खोटे, माधव गारशे यांचा सहभाग होता.मचाणावरुन या प्राण्यांची नोंदनागझिरा-नवेगाव कॅरिडोर व बफर क्षेत्रामध्ये प्राणी गणनेसाठी उभारण्यात आलेल्या मचणावरुन बिबट,अस्वल ,नीलगाय , चितळ, सांभर, रानगवा, रान डुक्कर , रान कुत्री ,चांदी अस्वल आदी वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली.
२१ मचाणांवरुन झाली प्राणीगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:45 IST
दरवर्षी बुध्द पोर्णिमेला नागझिरा-नवेगावबांध संरक्षित जंगलात प्राणी गणना केली जाते. यावर्षी सुध्दा १८ मे रोजी वन्यजीव, वन विभाग आणि सेवा संस्थेच्या संयुक्तपणे २१ मचणावरुन प्राणी गणना करण्यात आली.
२१ मचाणांवरुन झाली प्राणीगणना
ठळक मुद्देसेवा संस्थेचा सहभाग : अनेक वन्यप्राण्यांची नोंद, वन्यजीव व वन विभागाचे सहकार्य