शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

२१ लाईनमन सांभाळतात १५० गावांचा कारभार

By admin | Updated: June 19, 2014 00:08 IST

कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन

विद्युत विभागाचे दुर्लक्ष : पदभरतीची नागरिकांची मागणी सालेकसा : कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात नसल्याने विद्युत वितरण ्रकंपनी व शासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीक मात्र त्रास भोगत आहेत. येथे २१ लाईन नमन १५० गावांचा कारभार सांभाळत असल्याचे चित्र असून यामुळे नागरिकांना मिळावी तशी सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत १५ लाईनमनची पदे रिक्त आहेत. कित्येक वर्षापासून ही पदभरतीच झाली नाही. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक सिंचनाची सोय आहे. तसेच पुजारीटोला व मानागढ धरणाचे पाणि असल्याने कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी एखादे प्रकरण मंजूर झाल्यानंतर सदर प्रकरण कार्यालयातच धुळखात असते. वेळोवेळी तक्रार व निराकरण करण्यातच वेळ निघून जातो. या कार्यालयात कामे अधिक आणि पदे कमी असा कारभार झाला आहे. सालेकसा तालुक्यात १० फिडर आहेत. त्यामध्ये तिरखेडी, दर्रेकसा, सालेकसा, साकरीटोला, नवेगाव, सोनपुरी, हेटीटोला, सोनेखारी, कावराबांध आणि एक एक्सप्रेस फिडर वाटर बॉक्स कोटरा यागावी असून कर्मचारी नसल्यामुळे खोळंबा होतो. २१ लाईनमनकडे काही गावे आमगाव तर देवरी तालुक्यातील गावे सालेकसा उपविभागीय जोडले असून आमगाव तालुक्यातील जोडलेली गावे कवडी, अंजोरा, बोरकन्हार, चिमनटोला, पानगाव, कन्हारटोला, हलबीटोला, रामाटोला तर देवरी तालुक्यातील जोडलेली गावे हरदोली सोनेखारी, सोनारटोला, डोंगरगाव, सावली यांचा समावेश आहे. तालुक्यात ३ महत्वपूर्ण फिडर आहेत. यामध्ये सालेकसा, दर्रेकसा, साकरीटोला हे महत्वपूर्ण फिडर आहेत. असे असतानाही सालेकसा येथेच भारनियमन आहे. दर्रेकसा नक्षलग्रस्त आदिवासी गावांमध्ये आजही काही गावे अंधारात तर काही जंगलव्याप्त गावात विद्युत पुरवठा नाही. तर काही गावात कित्येक वर्षापासून विद्युत चोरीचा तडाखा सुरू आहे. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना व सामान्य माणसाला विजेची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करून तातडीने या कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी व तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे. विद्युत विभागात लाईनमेनचे पद महत्वाचे असते. येथे मात्र २१ लाईनमेनवर १५० गावांचा कारभार देण्यात आल्याने त्यांचीही कोठे जाऊ कोठे नाही अशात त्यांची पंचाईत होते. याकडे विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)