शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२०० ग्रामसेवकांचे पाच कोटी रूपये थकीत

By admin | Updated: August 3, 2016 00:16 IST

शासकीय सेवेत १२ वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतरही त्यांची अंशदायी पेन्शन योजनेची थकीत रक्कम

प्रकरण अंशदायी पेन्शन योजनेचे : ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर धरणे भंडारा : शासकीय सेवेत १२ वर्षे ग्रामसेवक म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतरही त्यांची अंशदायी पेन्शन योजनेची थकीत रक्कम जिल्हा परिषदकडून देण्याबाबत टाळाटाळ होत आहे. जिल्ह्यातील २०० ग्रामसेवकांचे सुमारे पाच कोटी रूपये थकीत आहे. ती देण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने ग्रामसेवकांनी आज सोमवारला जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांवरच जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय होत आहे. याचा निषेध करण्यासाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवने यांनी केले. जिल्ह्यातील सातही पंचायत समिती अंतर्गत सुमारे ३५० ग्रामसेवक कार्यरत असून हे सर्व या आंदोलनात सहभागी झाले. जिल्हा परिषदने २००४ मध्ये कंत्राटी ग्रामसेवकांची पदभरती केली. त्यांचा तीन वर्षांचा सेवाकाळ झाल्यानंतर त्यांना सेवेत नियमित करण्यात आले. दरम्यान प्रत्येक ग्रामसेवकांच्या वेतनातून अंशदायी पेंशन योजनेच्या नावावर वेतनावर आधारीत काही रक्कम कपात केली. कपात झालेली रक्कमेवर शासन हिस्सा व त्यावर १० टक्के व्याज अशी सुमारे अडीच ते तीन लाखांची रक्कम ग्रामसेवकांना मिळणे गरजेचे आहे. ग्रामसेवक संघटनेने याबाबत अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाला विचारणा केली. मात्र, त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सुमारे २०० ग्रामसेवकांना यातून पाच कोटींची रक्कम मिळणे आहे. ती अद्याप मिळालेली नाही किंंवा त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे ग्रामसेवकांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाल्याने संघटनेने वेळोवेळी आंदोलन केली. आज धरणे आंदोलन करून निर्वाणीचा इशारा दिला आहे. आंदोलनाला जयंत गडपायले, विवेक भरणे, एम. सी. खांडाळकर, एन. जी. सौदागर, एम. एस. शेंडे, रमेश झोडे, प्रभाकर रामटेके, यु. के. पाटे, अमित चुटे, मंगला डहारे, पी. आर. रामटेके, नरेश शिवणकर यांच्यासह अन्य ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)