शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात २० गावांना पुराचा वेढा; दोनशेवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:43 IST

वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शनिवारी (दि.२९) याचा नदी काठालगतच्या २० गावांना फटका बसला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरू केले आहे.

ठळक मुद्देअनेक मार्ग अजूनही बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी नाले भरुन वाहत आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुजारीटोला, कालीसरार, संजयसरोवर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तर वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शनिवारी (दि.२९) याचा नदी काठालगतच्या २० गावांना फटका बसला. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरू केले आहे.गोंदिया तालुक्यातील कोरणी, कासा, कंटगटोला, भद्याटोला, जिरुटोला, डांगोर्ली काटी या गावांमध्ये वैनगंगा आणि बाघ नदीचे पाणी साचल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटेपासूनच वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली. दरम्यान पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते.गोंदिया तालुक्यातील कोरणी येथील ८ नागरिकांना तसेच तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील १०६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू करण्यात आले होते. कोरणी, डांगोर्ली, जिरूटोला, भद्याटोला या गावांमध्ये पुराचे पाणी साचल्याने अनेक घरे अर्धी बुडाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पांजरा-भोसा, कामठा-नवरगावकला, चांदोरी खुर्द-बघोली, आमगाव-किडंगीपार, आमगाव-कामठा हे मार्ग अद्यापही बंद आहेत. सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले भरुन वाहत असल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.नदी काठालगताच्या गावांना सर्तकतेचा इशारामध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शनिवारी (दि.२९) सकाळी या धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे बाघ आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील चौवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.इटियाडोह ओव्हर फ्लोच्या मार्गावरजिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अजुर्नी मोरगाव तालुक्यातील नवेगाबांध जलाशय ओव्हर फ्लो झाला तर इटियाडोह धरण ओव्हर फ्लोच्या मार्गावर आहे. शनिवारी तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशय ओव्हर फ्लो झाला. तर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्यांवर आहे.

टॅग्स :floodपूर