पोलिसांचा चोख बंदोबस्त : संवेदनशीलस्थळी करडी नजर गोंदिया : हिंदू धर्मात महत्व असलेला होळी सण आज (दि.१२) रोजी साजरा करण्यात आला. जिल्ह्यात सार्वजनिक खासगी अश्या २ हजार ४०१ ठिकाणी होळीचे दहन करण्यात आल्या आहेत. होळीचे सण महत्वपूर्ण असतानाही या सणाला अनेक जन जून्या वैमन्यातून व गुन्हेगारी जगतातील लोकांकडून मारामाऱ्या, खून यासारखे प्रकार घडतात. एवढेच नव्हे तर, अनेक जण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालतात. या प्रकारावर आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत परिसरातील गावात पोलीस कर्मचारी, सी-६० जवान यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान मिळून दिड हजार पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. हे कर्मचारी संबंधित ठाणेदारांच्या अधिनस्त जिल्ह्याची सुरक्षितता व सामाजिक व्यवस्थेवर करडी नजर ठेवणार आहेत. प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कार्यरत आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचेही पदाधिकारी सहकार्य करीत आहे. या सणादरम्यान मोठे गुन्हे घडण्याची शक्यता असते, त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून शहरातील काही ठिकाणांना अतिसंवेदनशील घोषित केले आहे. सार्वजनिक व खासगी होळी दहनासाठी आलेल्या अर्जामध्ये सार्वजनिक १ हजार ३२९ ठिकाणी तर खाजगी १ हजार ७२ ठिकाणी होळीचे दहन झाले. मागच्या वर्षी १ हजार १२४ सार्वजनिक तर १ हजार ११९ ठिकाणी खासगी होळी दहनाची परवानगी देण्यात आली होती. यंदा गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत १६० सार्वजनिक तर ३१५ खासगी, ग्रमाीण पोलीस ७० सार्वजनिक तर खासगी ८०,रामनगर ७७ सार्वजनिक तर ८२ खासगी, रावणवाडी ८२ सार्वजनिक तर १०३ खासगी, गंगाझरी सार्वजनिक ८०, दवनीवाडा ७० सार्वजनिक तर खासगी २६, तिरोडा १०० सार्वजनिक तर खाजगी ६५, गोरेगाव १७० सार्वजनिक तर ५६ खासगी, आमगाव ७५ सार्वजनिक तर ७९ खाजगी, देवरी ११५ सार्वजनिक तर १६० खासगी, चिचगड ९५ सार्वजनिक तर खासगी २५, नवेगावबांध ६० सार्वजनिक तर १० खासगी, केशोरी ३० सार्वजनिक तर १५ खासगी, अर्जुनी मोरगाव ९० सार्वजनिक तर ५२ खासगी त्याचबरोबर सालेकसा सार्वजनिक ५५ तर खासगी ५ ठिकाणी असे १ हजार ३२९ सार्वजनिक तर १ हजार ०७२ खासगीत होळीचे दहन करण्यात आले.अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह गृररक्षकांचा कडेकोट बंदोबस्त आहे. (तालुका प्रतिनिधी) तंटामुक्त समित्यांची मदत गावात होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात दारूची उलाढाल होत असल्याने अवैध दारूविक्रेत्यांना लगाम लावण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी प्रयत्न केले. त्यावरही गावात दारू लपून-छपून विकली तरी दारूमुळे होणाऱ्या वादावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाला सज्ज ठेवण्यात आले आहे. गावात होळीचा सण शांतेतत साजरा व्हावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात २ हजार ४०० होलिका दहन
By admin | Updated: March 13, 2017 00:20 IST