शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध येथे २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST

नवेगावबांध : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजतापासून सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजतापर्यंत येथे अत्यावश्यक सेवा वगळून ...

नवेगावबांध : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शुक्रवारी (दि.९) रात्री ८ वाजतापासून सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजतापर्यंत येथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना व दुकान कडकडीत बंद आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत २ दिवसांचा कडकडीत ‘वीकेंड लॉकडाऊन’ पाळला जात आहे.

‘वीकेंड लॉकडाऊन’ या कालावधीत गावकऱ्यांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, येथील सर्व आस्थापना व दुकानी शनिवारी (दि.१०) कडकडीतपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. येथील बस स्थानक, आझाद चौक, बालाजी चौक, इंदिरा चौक, टी-पॉइंट चौक हे एरवी वर्दळ असणारे ठिकाण ‘वीकेंड लॉकडाऊन’मुळे निर्मनुष्य झाले आहेत. सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत असून, नियमांचे पालन व्हावे व संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, याकडे नवेगावबांध पोलीस लक्ष ठेवून आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेली आस्थापना व दुकाने मात्र ‘वीकेंड लॉकडाऊन’मधून वगळण्यात आली आहेत.

इतर आस्थापना व दुकान सुरू आढळल्यास, तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नागरिक घराबाहेर आढळल्यास, त्यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम १९८७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे ग्रामपंचायतच्या आदेशात म्हटले आहे. सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजतापर्यंत घोषित केलेल्या कडकडीत लॉकडाऊनला येथील ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अनिरुद्ध शहारे व ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण यांनी केले आहे. ठाणेदार जनार्दन हेगडकर व त्यांचे सहकारी गावात गस्त करीत असून, परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहेत.