शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी ६२ लाखाने ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:19 IST

अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून सहकारी पतसंस्था, बँका, ईतर सहकारी पतसंस्था व बॅकेत पैसे टाकलेल्या ग्राहकांचे पैसे बुडाले. तसेच नोकरीच्या नावावर मोठ्या प्रमाणात गंडविण्यात आले. असे फसवणुकीचे ६८ गुन्हे वर्षभरात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देवर्षभरात ६८ गुन्हे दाखल : ४ लाख २८ हजार जप्त, आरोपींचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून सहकारी पतसंस्था, बँका, ईतर सहकारी पतसंस्था व बॅकेत पैसे टाकलेल्या ग्राहकांचे पैसे बुडाले. तसेच नोकरीच्या नावावर मोठ्या प्रमाणात गंडविण्यात आले. असे फसवणुकीचे ६८ गुन्हे वर्षभरात दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांची तपासणी केली असता जिल्ह्यात २ कोटी ६२ लाखाने फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.सहकारी कायद्याखाली काम करणाऱ्या पतसंस्था, मल्टीलेव्हल मार्केटींग संस्था, शिक्षण संस्था, घरासाठी कर्ज देणाºया संस्था, नोकरी देणाºया संस्था, शेअर्स देणाºया संस्था व नोंदणी झालेल्या कंपन्या ग्राहकांना गंडा घालत आहेत. काही पतसंस्थानी व मल्टीलेवल मार्केटींग कंपन्यांनी ग्राहकांना लुबाडले. परंतु त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले नाही. मात्र त्यांच्या एजंटाना धमकाविण्याचे काम केले जात आहे. चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या वर्षभरात फसवणुकीचे ६८ गुन्हे दाखल करण्यात आले. दोन पतसंस्थांनी २७ लाख ७५ हजार ६८८ रूपये हडपले. यातील ७३ हजार ४ आरोपींकडून जप्त करण्यात आले. बँक व्यवहारात अपहार झाल्याचे चार प्रकरण दाखल करण्यात आले. या चार प्रकरणात ३३ लाख ८३ हजार ३०१ रूपयाचा गंडा घालण्यात आला. नोकरीचे आमिष देऊन लुटल्याचे ६ गुन्हे दाखल करण्यात आले. यात सहा गुन्ह्यात ३८ लाख ७४ हजाराने लुटल्याची बाब पुढे आली व ९ आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन खरेदीविक्री व्यवहारात फसवणूक झाल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात १० लाखाने फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.आंतरराज्यीय किंवा आंतरराष्टÑीय स्तरावर व्यवसाय, व्यापाराच्या नावाने कट रचून फसवणूक केल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आला. यात ४ लाख ६० हजाराने फसवणूक करण्यात आली. इतर सर्वसाधारण आर्थिक फसवणूकीचे ५४ गुन्हे दाखल करण्यात आले. यात एक कोटी ४७ लाख ३९ हजार १८४ रूपयाने फसवणूक करण्यात आली. यातील ३ लाख ५५ हजार ९४६ रूपये जप्त करण्यात आले. यात ३७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.