शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात १९७ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:09 IST

जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देशून्य मृत्यू अभियान अपयशी : गोंदियात होऊ शकते गोरखपूरची पुनरावृत्ती

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अभियान राबविले जात आहे. मात्र दुसरीकडे याच अभियानाला काळे फासण्याचे काम बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय करीत आहे. गेल्या सात महिन्यात एकट्या गंगाबाईत रुग्णालयात १९७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.जिल्हा आदिवासी व नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल आहे. या भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. यासाठी शून्य मृत्यू अभियान राबविण्याचा संकल्प जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे केला.त्यांनी बैठका घेऊन सर्व आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांना सूचनाही दिल्या. मात्र गंगाबाईतील बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गंगाबाईत आलेल्या रूग्णांची आकडेवारी पाहता जानेवारी महिन्यात ५६५ महिलांची प्रसूती करण्यात आली. त्यात आयूडी ११ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे पाच बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ८ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात ५१० महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ८ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १३ बालके अश्या २३ बालकांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात ५५४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी ५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या १६ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ४९७ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १२ बालके अश्या २४ बालकांचा मृत्यू झाला. मे महिन्यात ५६४ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ५ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील १९ बालके अश्या ३९ बालकांचा मृत्यू झाला. जून महिन्यात ५२५ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी १५ बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे ४ बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील ९ बालके अश्या २८ बालकांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात ५६६ महिलांची प्रसूती करण्यात आली. यात आयूडी २० बाळ मृत पावले होते. प्रसूती केल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन बालके तर नवजात अतिदक्षता कक्षातील २१ बालके अश्या ४३ बालकांचा मृत्यू झाला. या सात महिन्यात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात बालमृत्यूचे तांडव सुरू असतानाही आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनही निद्रावस्थेत आहे.अतिदक्षता कक्षावर प्रश्नचिन्हगंगाबाई स्त्री रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबातील गर्भवती प्रसूतीसाठी दाखल होतात. येथे जन्माला येणारी बालके सर्व सामान्य बालकांच्या वजनापेक्षा कमी वजनाची असल्यामुळे त्या बालकांना योग्य उपचार देण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सुसज्ज नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आला. परंतु येथे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात ९१ बालकांचा मृत्यू झाला.रिक्त पदांमुळे कर्मचारी त्रस्तगंगाबाई स्त्री रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांवर भार येत आहे. त्यामुळे त्यांना अठरा अठरा तास काम करावे लागते. गंगाबाई स्त्री रूग्णालयात ६ बधीरीकरण तज्ज्ञांची गरज आहे. परंतु येथे एकच तज्ज्ञ कार्यरत आहेत. मेडीकल कॉलेजचे बधीरीकरण तज्ज्ञ काम करीत नाही. गंगाबाई स्त्री रूग्णालयात सहा बालरोग तज्ज्ञांची गरज असताना केवळ तीनच कार्यरत आहेत. परिचारीकांची ६० पदे मंजूर असताना ३४ जागाच भरल्या आहेत. वर्ग चारचे ४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना स्ट्रेचरवर नेण्याचे काम नातेवाईकांनाच करावे लागते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.गर्भातच दगावली ८४ बालकेगर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी केलेले दुर्लक्ष, वेळोवेळी उपचार नाही, खानपाणात अनियमितता, असंतुलीत आहार, प्रथीने, विटॉमीन, लोह गर्भवतींना वेळीच मिळत नसल्यामुळे त्यांच्या पोटातील गर्भाची वाढ होऊ शकली नाही. सतत होणाºया दुर्लक्षीततेमुळे जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी ८, मार्च ५, एप्रिल १०, मे १५, जून १५ व जुलै २० अशा एकूण ८४ बालकांचा गर्भातच मृत्यू झाला.