शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित

By admin | Updated: June 25, 2017 01:08 IST

येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

नागपूर विद्यापीठाचा कारभार : ‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल नापास लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली मात्र त्यांना एका पेपरला गैरहजर दाखवून नागपूर विद्यापीठाने नापास दाखविले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय गोंदिया येथील द्वितीय वर्षाच्या कम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ४ सेमचा ‘इंट्रोडक्शन टू मेन फेम ’ या विषयाचा पेपर दिला. त्या पेपरला गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरहजर असल्याचे दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला. शुक्रवार (दि.२३) रोजी नागपूर विद्यापीठाने निकाल जाहीर केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नापास दाखविल्याने त्या विद्यार्थ्यांना धडकी भरली. त्यांनी महाविद्यालय गाठले त्यांनी यासंदर्भात प्राचार्य व विभाग प्रमुखांसोबत बोलून यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला कळविण्याची विनंती केली. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यासंदर्भात माहिती महाविद्यालयातर्फे नागपूर विद्यापीठाला पाठविण्यात आले. परंतु नागपूर विद्यापीठात बसलेल्या लिपीक वर्गाच्या अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना गैरहजर दाखवून त्यांचा निकाल नापास दाखविण्यात आला आहे. निकाल शुक्रवारी आल्यामुळे सर्व विद्यार्थी शनिवारी महाविद्यालयात पोहचले. परंतु महिन्याचा चवथा शनिवार असल्याने विद्यापीठ बंद, रविवारची सुट्टी, पुन्हा सोमवारी रमजान ईद असल्यामुळे सलग तिन सुट्या आल्याने आपण वेळीच आक्षेप कसा घेणार या संभ्रमात विद्यार्थी होते. महाविद्यालयाने या बाबीची दखत घेत मंगळवारी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांचा निकाल बरोबर करण्यासाठी त्यांच्या सर्व हजेरी विद्यापीठात पोहोचविणार असल्याचे सांगण्यात आले. गैरहजर दाखविलेले विद्यार्थी काम्प्यूटर टेक्नॉलॉजी या माध्यमाच्या १९ विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाने गैरहजर दाखविले. त्यात प्रणय बावणकर, हरिष बहेकार, हिमांशू मेश्राम, करण राजभार, कार्तिक यादव, मनिष उके, प्रजय बागडे, प्रखर दिक्षीत, प्रणय भगत, शंकर चिमाणी, श्रेयस ईटानकर, शुभम शरणागत, सेल्व्हन्स ऐंथोनी, रजत शेंदरे, शुभम घोष, सुभाशू बावणथडे, उदीत खोटेले, विपीनकुमार पटले, यश चांदवानी अशी सदर विद्यार्थ्यांची नावे आहेत. पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आले. ही नागपूर विद्यापीठाची चुकी आहे. आम्ही विद्यार्थ्यांची हजेरी,गैरहजेरी बरोबर पाठविली आहे. या १९ विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लिपीकासह मी स्वत: मंगळवारी नागपूर विद्यापीठात जाईल. - आय.सी. मेहता कम्प्यूटर टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख एमआयटी गोंदिया.