दोन घटनांतील आरोपी मोकाट : खुनाच्या प्रयत्नाच्या २१ घटनागोंदिया : जिल्हा महाराष्ट्रातील छोटा जिल्हा असला तरी या जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न व मारामाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही घटनांना पोलिसांनी खून नसल्याचे सांगून काही घटनांना आत्महत्या तर काही घटनांना अपघात दाखविल्याचा आरोप घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. परंतु पोलिसांनी जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्याच्या काळात खुनाच्या १९ घटना नोंद केल्या आहेत. मात्र दोन खुनातील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्े आहेत. काही पोलीस ठाण्यांतर्गत खुनाच्या घटना नोंद नसल्यातरी त्याच्या बदल्यात इतर पोलिस ठाण्यात एकापेक्षा अधिक खुनाच्या घटना घडल्याच्या नोंदी आहेत. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्याच्या काळात १९ खुनाच्या घटना नोंद करण्यात आल्या आहेत. त्यातील १७ घटनांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र आमगाव व गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या दोन प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश आले नाही. खुनाचा प्रयत्न करण्याच्या २१ नोंदी घेण्यात आल्या. या सर्व प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. दुखापतीच्या १८८ घटना घडल्या आहेत. यातील १८६ प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आले. तर दोन प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही. गोंदिया जिल्ह्यात शारिरिक गुन्हे वाढत चालले आहे. खून, खुनाचा प्रयत्न व मारामाऱ्या असे गुन्हे घडत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आठ महिन्यात जिल्ह्यात १९ खून
By admin | Updated: September 10, 2015 02:21 IST