शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
3
Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "मराठा समाजासाठी जे करता येईल ते केलं आणि यापुढे करु"; आंदोलनावर एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका
5
Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
6
Samsung Galaxy A17: २० हजारांत जबरदस्त फीचर्स; सॅमसंगच्या 5G फोनची बाजारात एन्ट्री!
7
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
8
३० KM मायलेजसह लवकरच लॉन्च होणार Maruti Fronx Hybrid, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...
9
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
10
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
11
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
12
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
13
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
14
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
15
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
16
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
17
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
18
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
19
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
20
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?

१८ तासांचे भारनियमन

By admin | Updated: February 20, 2015 01:19 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे परसवाडा परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

परसवाडा : येथील वीज वितरण कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे परसवाडा परिसरातील अनेक गावांमधील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. रिडींग न घेताच वीज बिल देण्याचा प्रकार घडत असताना आता १८-१८ तासांचे भारनियमन केले जात असल्यामुळे रबीच्या पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.बाघोली, चांदोरी खुर्द, बोरा, सोनेगाव, करटी बु., करटी बु. पिपरिया, सावरा, अर्जुनी, बोंडराणी, गोंडमोहाडी, अत्री, बोदा, बिहीरीया, इंदोरा बु., किंडगीपार, परसवाडा, डब्बेटोला, महालगाव, मुरदाडा, धापेवाडा, पुजारीटोला या गावांत मोठ्या प्रमाणात रबी धानाची लागवड केली जाते. दिवसभरात १८ तास शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा बंद असतो. फक्त सहा तास विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे धानाची नर्सरीही करपत आहे. काही शेतकऱ्यांची रोवणीही वाळली आहे. शेतकऱ्यांनी बँकेडून पीक कर्ज घेतले. सावकाराकडून कृषी केंद्रातून खत व बियाणे उसणवारीवर आणले. मात्र महावितरणने सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर नवीन संकट आले आहे. विद्युत विभाग रिडींग न घेता शेतकऱ्यांना जास्तीचे बिल देत असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. एकीकडे शासनाने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना भारनियमनापासून मुक्त करू, विद्युत बिल माफ करू, अशी आश्वासने दिली होती. मात्र आता त्याच सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्येसाठी प्रोत्साहन देणारी परिस्थिती आणली जात आहे. यातून शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. बँकेची कर्ज परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, लग्न ही कामे अशी करावी असे प्रश्न समोर आहे. सात दिवसात भारनियमन बंद न झाल्यास जि.प. सदस्य डॉ.योगेंद्र भगत, रमेश पटले, रामेश्वर हरिणखेडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्याचा इशारा पं.स. सदस्य रमेश पटले, सुभाष अंबुले, घनश्याम चौधरी, मज्जीत छवारे, प्रकाश अग्रवाल, मुन्ना पटले, रमेश बागळे, पंकज ठाकरे, रामप्रसाद राऊत, अरूण मिश्रा, नारायण लिल्हारे, अर्जुन लिल्हारे, मुन्ना लिल्हारे, तारा अंबुले, टेकचंद जमईवार, मनराज पटले, त्रिलोकचंद जमईवार, कवळू अंबुले, महेंद्र भगत, संदीप भगत, तारेंद्र भगत, राजु कडव, खुशाल कडव, प्रेमलाल पटले, सुरेश पटले यांनी दिला आहे. (वार्ताहर)