अपंगांचा सामूहिक विवाह सोहळा : रजग जनहित विकास मंचचा उपक्रम गोंदिया : येथील रजग जनहित विकास मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या द्वितीय अपंग व सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ््यात १८ जोडप्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने ‘शुभमंगल’ लावण्यात आले. आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत आयोजीत या विवाह सोहळ््याला शहर कॉँग्रेस कमिटी महासचिव अपूर्व अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, छावा संग्राम परिषदेचे निलम हलमारे, पूर्णा पटेल फँस क्लबचे अध्यक्ष संजीव रॉय, दिनेश चव्हाण, तारासिंह चव्हाण, सुनिता तोमर उपस्थित होते. आमदार जैन, कॉंग्रेस कमिटी महासचिव अपूर्व अग्रवाल व उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून सोहळ््याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार जैन यांनी, रजग विकास मंचचे प्रयत्न समाज सेवेच्या क्षेत्रात करण्यात येणार अभिनव प्रयत्न आहे. त्यांच्या या उपक्रमांना भविष्यात जमेल ते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. उप विभागीय अधिकारी राठोड यांनी, संस्थेच्या कार्याची प्रशंसा करीत सहकार्याचे आश्वासन दिले. अग्रवाल यांनी, अपंग वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचे पवित्र कार्य संस्था करीत असून त्यांना आमदार गोपालदास अग्रवाल व प्रताप चेरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रास्तावीक संस्थेच्या अध्यक्ष रूचिता चव्हाण यांनी तर आभार संस्थापक राजू ठाकूर व उपाध्यक्ष शक्ती बैस यांनी मानले. कार्यक्रमासाठी सदस्य धर्मराज काळे, आरती पटले, सिमा श्रीवास्तव, शिल्पा श्रीवास्तव, रवी वासनिक, अनमोल वासनिक, मिलींद भालाधरे, टिक लू बनोटे, हरिराम बरबटे, रामकिसन भांडारकर, मोहन नावानी, अशोक मोरघडे, सुधीर पाठक, नवीन जोशी, संदीप गौतम, वसीम शेख, नागो शहारे, पिंटू नंदेलवार, गन्नू महाराज, निकीता वासनिक आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
१८ जोडप्यांचे ‘शुभमंगल’
By admin | Updated: May 20, 2016 01:35 IST