गोळ्या वाटप सुरू : मोहिमेनंतरही पडत आहे नवीन रुग्णांची भरगोंदिया : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाकडून गोळ्या वाटपाची मोहीम राबविली जात आहे. यामुळे हत्तीपायाच्या नवीन रुग्णांची संख्या दरवर्षी कमी होत असली तरी जिल्ह्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत भर पडतच आहे. हत्तीरोगाला पूर्णपणे आळा घालणे अजूनही शक्य झालेले नाही. आजघडीला जिल्ह्यात हत्तापायाचे १७५७ रुग्ण आहेत.यावर्षी १४ डिसेंबरपासून हत्तीरोग दुरीकरणासाठी गोळ्या वाटपाची मोहीम सुरू झाली आहे. यात घरोघरी जाऊन सर्वांना गोळ्या दिल्या जाणार आहे. याशिवाय हत्तीरोगाचे नवीन रुग्ण तयार होऊ नये, हत्तीरोग बाधीत अवयवांची स्वच्छता व काळजी घेणे, हत्तीरोगाविषयी लोकांना आरोग्य शिक्षण देणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत.२०१० मध्ये जिल्ह्यात हत्तीपायाचे १४४८ रुग्ण होते. गोळ्या वाटपाच्या मोहीमेनंतर दुसऱ्या वर्षी त्यात १६८ रुग्णांची भर पडली. २०११ मध्ये ९५ रुग्ण, २०१२ मध्ये ७४, सन २०१३ मध्ये ८७ रुग्ण, २०१४ मध्ये ३५ रुग्ण तर यावर्षी २६ रुग्ण आढळले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात हत्तीपायाचे १७८३ रुग्ण
By admin | Updated: December 16, 2015 01:56 IST