शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही १.७८ लाख नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर पुढे होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करावे असा सल्ला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम जोमात राबविली जात आहे. याचे फलित असे की, १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे असताना मात्र हे नागरिक आपल्याच मस्तीत वागत असताना दिसत आहेत.

------------------------

१) लस दुसऱ्या डोससाठीची मुदत

कोविशिल्ड ८४ दिवस

कोव्हॅक्सिन २८ दिवस

२) जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ)

पहिला डोस - ५८१२२६

दुसरा डोस - १७०५६१

--------------------

दुसरा डोसही तितकाच आवश्यक

- कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शरीरात कोरोनाविरोधात प्रतिपिंड तयार करण्यासाठी या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे.

- त्यानुसार, दोन्ही लसींमध्ये ठरावीक कालावधी ठरवून दुसरा डोस दिला जात आहे; कारण यातून त्या लसींची कार्यक्षमता अधिक वाढते व प्रतिपिंड तयार होऊन अधिक कालावधीपर्यंत आपल्या सुरक्षित ठेवते.

------------------------------

शेतीची कामे, कोरोना गेल्याचा संभ्रम

जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असून आजघडीला जिल्ह्यात फक्त दोन बाधित आहेत. यामुळे आत कोरोना गेल्याने लस घेण्याची गरज काय, असा संभ्रम नागरिकांत आहे. शिवाय, सध्या शेतीची कामे सुरू असून डोस घेतल्यास ताप येणार व अशात कामे खोळंबणार हा विचार करूनही नागरिक दुसरा डोस टाळत असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------

दोन्ही डोस गरजेचे

कोरोनापासून सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता जिल्ह्यातून कोरोना गेला असा संभ्रम न बाळगता प्रत्येकाने आपले डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे लवकरात लवकर डोस घेऊन स्वत:सह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करा.

- डॉ. भूमेश पटले, जिल्हा समन्वयक