शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागात होणार १७ मोबाईल टॉवर्स

By admin | Updated: September 13, 2014 02:00 IST

जिल्ह्यातील नक्षलप्रभावित व अतिसंवेदनशील क्षेत्रात १७ मोबाईल टॉवर लावण्यात येणार आहेत.

देवानंद शहारे गोंदियाजिल्ह्यातील नक्षलप्रभावित व अतिसंवेदनशील क्षेत्रात १७ मोबाईल टॉवर लावण्यात येणार आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून याबाबतचे पत्र पाठवून सदर मोबाईल टॉवर लावण्यासाठी साधन साहित्य उपलब्ध केले जात असल्याची माहिती बीएसएनएलला कळविण्यात आली आहे. दूरसंचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नक्षलप्रभावित क्षेत्र असलेल्या देवरी, आमगाव, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव तालुक्यात हे मोबाईल टॉवर्स लावण्याचे कार्य लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या गावांत हे टॉवर्स लावण्यात येणार आहेत, त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व दूरसंचार विभागाचे विभागीय उपव्यवस्थापक एस.एन. हेडाऊ तसेच इतर अधिकाऱ्यांची या संदर्भात नुकतीच एक बैठकही पार पडली. संवेदनशील क्षेत्रातील नक्षल्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या मोबाईल टॉवर्सचा उपयोग केला जावू शकतो. नक्षलवाद्यांचे मोठे नेटवर्क व त्यांच्या हालचाली बघता केंद्र शासनाकडून हे पाऊल उचलले जात आहे. अतिदुर्गम व जंगल-पहाडांमध्ये असलेल्या क्षेत्रात, जेथे नक्षल्यांच्या अधिक हालचाली होतात, तेथे आपले नेटवर्क मोठे करण्याच्या उद्देशाने शासनाकडून आता सदर पुढाकार घेतला जात आहे. नक्षलग्रस्त क्षेत्रात १७ टॉवर्स लावण्याचा प्रस्ताव तर आहेच, याशिवाय जिल्ह्यातील काही शहरी व ग्रामीण भागासाठी पुन्हा १० मोबाईल टॉवर्स लावण्याचा प्रस्ताव असल्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र ते कधीपर्यंत लावले जातील याचा निश्चित कालावधी मात्र सध्या कुणालाही ठाऊक नाही. सध्या जिल्ह्यात एकूण ९८ मोबाईल टॉवर्स आहेत. या टॉवर्सवरून जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईल सेवा पुरविली जाते. मात्र अनेक ठिकाणी बीएसएनएलची सेवाच वारंवार ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे.