शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशा रेल्वे मार्गावर १६५ किमी विद्युतीकरण

By admin | Updated: February 21, 2016 00:57 IST

बल्लारशा रेल्वे मार्गावर सन २०१२ पासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम सन २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.

१०३ किमीचे काम पूर्ण : ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण होण्याची शक्यता विकास बोरकर गोंदियाबल्लारशा रेल्वे मार्गावर सन २०१२ पासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम सन २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र निश्चित करण्यात आलेल्या २६२ किलोमीटरच्या विद्युतीकरणातील फक्त १६५ किलोमीटरचे विद्युतीकरण करण्यात यश आले आहे. परिणामी रेल्वे विभागाने विद्युतीकरणाचा कालावधी वाढवून आता सन २०१७ पर्यंत हे काम करण्याची मुभा दिली आहे. तरीही उर्वरित १०३ किमी अंतराचे विद्युतीकरण या कालावधीत पूर्ण होणार काय? याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. विद्युतीकरणाच्या या कामाचे कं त्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. सिकंदराबाद येथून मुख्य परियोजनेचे कामकाज पाहीले जात आहे. गोंदिया रेल्वे स्टेशनवरील काही अभियंतेही या कामावर नजर ठेवून आहेत. हा जुना प्रोजेक्ट असल्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाही कामाची गती कमी आहे. यामुळेच २६२ किमी अंतराच्या विद्युतीकरणाच्या या कामातील फक्त १६५ किमी अंतराचेच विद्युतीकरण झाले आहे. गोंदिया ते आलेवाहीपर्यंतचे विद्युतीकरण झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात प्रोजेक्ट कार्यालयातील कार्यरत अभियंता एस.एम.शरीफ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला.असा होणार लाभ विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास गाड्यांमध्ये बोगींची संख्या वाढणे शक्य आहे. म्हणजेच या मार्गावर गाडी जास्त भार वहन करू शकणार आहे. याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाडयांना गोंदियात पॉवर चेंज (इंजिन बदल) करावा लागत होता तो नंतर करावा लागणार नाही.दुसरी लाईन टाकणे गरजेचे विद्युतीकरणाचा थोडा फायदा असला तरी खूप जास्त फायदा होणार असल्याचे दिसून येत नाही. खऱ्या अर्थाने या मार्गावर लाभ देण्यासाठी दुसरी लाईन टाकणे गरजेचे आहे. मात्र रेल्वे विभागाने त्याकडे अद्याप फारसे लक्ष दिलेले नाही. येथे दुसरी लाईन टाकल्यास गाड्यांच्या संख्येत वाढ करणे शक्य होणार आहे.अहीर यांच्याकडून दबावचंद्रपूरचे खासदार तथा केंद्र शासनात मंत्री असलेल्या हंसराज अहिर यांच्या मतदार संघात या रेल्वे लाईनचा काही भाग येतो. त्यांनी या कामाला लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागावर चांगलाच दबाव बनविल्याची माहिती आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही भाग या रेल्वेमार्गात येतो. रेल्वे विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चनंतर बल्लारशापासून गोंदियाच्या दिशेने विद्युतीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे.