शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१६ हजार कुटुंबांची होणार पिण्याच्या पाण्याची सोय

By admin | Updated: November 15, 2014 01:49 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेला ४१९ सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे.

गोंदिया : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेला ४१९ सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ योजनांना मंजूरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील १६ हजार कुटुंबांना या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. या योजना नियमित सुरु झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना बारमाही शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असून पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार नाही.ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाद्वारे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम राबवण्यिात येत आहे. या अनुषंगाने अनेक प्रादेशिक नळ योजना सुरु असल्या तरी अनेकदा वीज बिल अथवा भारनियमनामुळे बऱ्याच योजना बंद आहेत किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आपेल्या प्रादेशिक नळ योजना ऐन टंचाईच्या काळात छोट्या गावांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचत नाही. यासाठी शासनाने सौरउर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजना राबविणे सुरु केले आहे. सदर योजनेतुन ४० ते ५० कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते व विजेचे भारनियमन अथवा बिलाचा भुर्दंडही नागरिकांवर बसत नाही. ही योजनादेखील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गतच राबविण्यात येते.गोंदिया जिल्ह्यात २०११-१२ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण २९५ अशा योजनांचा मंजूरी मिळाली होती. त्यापैकी २५७ योजना पुर्णत्वास आल्या असून ३८ योजना प्रगतिपथावर आहेत. यातुन जवळपास १० हजार कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत आहे. या योजनेचे पाच वर्षापर्यंतचे व्यवस्थापन संबंधित यंत्रणाच करीत असल्याने नागरिकांमध्येदेखील या योजनेची मागणी होत आहे. या अनुषंगाने आगामी वर्षात जि.प. ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४१९ नवीन प्रस्ताव मिळाले. जि.प. प्रशासनाने या सर्व प्रस्तावांना शासनाकडे पाठवून मंजूर करुन घेतले आहेत. प्रत्येक योजनेसाठी साडे चार ते पाच लाख रुपयां पर्यंतचा निधी शासनाकडून मिळणार असून या योजना पुर्णत्वास गेल्यास जिल्ह्यातील १६ हजार कुटुंबांना बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होणार आहे.या अनुषगांने प्रतिनिधीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अंगद सावंत यांना विचारणा केली असता त्यांनी या अनुषंगाने आपण शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याचे सांगितले. यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभल्यानेच ४१९ योजनांना शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. संपुर्ण देशात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत २० हजार योजनांना मंजूरी मिळाली असताना गोंदिया जिल्ह्याला मिळालेल्या मंजूरीचा आकडा निश्चितच जि.प. प्रशासनाच्या कार्यप्रणालीसाठी प्रेरणादायक असल्याचे ते म्हणाले.