शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१६ ठाण्यातील महिला पोलिसांची कुचंबणा

By admin | Updated: March 3, 2016 01:39 IST

जिल्ह्यात १६ पोलिस ठाणे असून त्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. मात्र आतापर्यंत या महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही ठाण्यात स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही.

स्वतंत्र प्रसाधनगृह नाही : मंजुरी मिळूनही निधीअभावी रखडले बांधकामनरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात १६ पोलिस ठाणे असून त्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत. मात्र आतापर्यंत या महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही ठाण्यात स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्या ठाण्यांमधील ३६७ महिला पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच कुचंबना होत आहे. मात्र आता ही कुचंबना दूर होण्याचे दिवस जवळ येत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला १६ लाख रुपये देण्याचे शासनाने ठरविले आहे. अद्याप तो निधी प्राप्त झालेला नाही.गोंदिया जिल्ह्यात आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, डुग्गीपार, अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध, केशोरी, गोरेगाव, तिरोडा, दवनीवाडा, गंगाझरी, रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर व गोंदिया ग्रामीण असे १६ पोलिस ठाणे आहेत. या १६ पोलिस ठाण्यात २५ ते ३० टक्के महिला कर्मचारी आहेत. गोंदिया पोलिस दलाच्या आस्थापनेवर ३६७ महिला कर्मचारी व ३ महिला अधिकारी कार्यरत आहेत. गोंदियाच्या पोलिस विभागाने सन २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षात प्रत्येक पोलिस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र विश्रामगृह व प्रसाधनगृह असावे असा प्रस्ताव पोलीस महानिरीक्षकांना मागच्याच (फेबु्रवारी) महिन्यात पाठविला. तो प्रस्ताव शासनाने मंजूरही केल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात १६ लाख रुपये खर्च करुन महिला कर्मचाऱ्यांकरिता प्रसाधनगृह बांधले जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महिलांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तर सोडाच प्रसाधनगृहसुद्धा नव्हते. पोलीस विभागाला २४ तास नोकरी करावी लागत असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अधिक ताण असतो. रात्र असो वा दिवस, महिला पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही काम करावेच लागते. त्यामुळे स्वतंत्र प्रसाधन गृह व विश्रामगृहाची व्यवस्था करण्यासाठी १६ पोलिस ठाण्याचा २ कोटी ५६ लाखांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.निधी केव्हा मिळणार?फेबु्रवारी महिन्यात या प्रस्तावाला पोलिस महानिरीक्षकांनी प्रशासकीय मान्यता दिली. परंतु शासनाने अद्याप बांधकामासाठी पैसे दिले नाही. पैसे आल्यानंतर लगेचच गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांमध्ये प्रसाधन व विश्रामगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.दुसऱ्यांची सुरक्षा करणाऱ्या महिलाच असुरक्षितमहिलांसाठी आतापर्यंत स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्याने नाईलाजाने पुरूष प्रसाधनगृहाचा वापर करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये संकोच आणि असुरक्षिततेची भावना असते. परंतु पोलीस विभागात शिस्तीच्या दबावाखाली महिलांना ही कुचंबना सहन करावी लागत आहे.महिलांची कार्यक्षमता वाढीस लागेलमहिला कर्मचाऱ्यांना २४ तास काम करावे लागत असल्यामुळे त्यांना स्वतंत्र विश्रामगृह व प्रसाधनगृह आवश्यक आहे. प्रसाधनगृह झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल. निधी मिळताच बांधकामाला सुरूवात होईल. -सुरेश भवरपोलीस उपअधीक्षक (गृह), गोंदिया