शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

१५३६ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे.

ठळक मुद्दे५० शाळांची नोंदणी रद्द : १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यक्तीमत्त्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. यांतर्गत, गोंदिया जिल्ह्यातील १६६६ पैकी १५३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.गोंदिया जिल्ह्यातील १६६६ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे.या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व शाळा आहेत. जिल्ह्यातील १६६६ शाळांपैकी १५३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. आमगाव तालुक्यातील १५४ शाळांपैकी १५० शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१० शाळांपैकी १८७ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.देवरी तालुक्यातील २०८ शाळांपैकी २०६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.गोंदिया तालुक्यातील ४१५ शाळांपैकी ३५६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. गोरेगाव तालुक्यातील १५८ शाळांपैकी १४२ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील १६७ शाळांपैकी १६३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. सालेकसा तालुक्यातील १५२ शाळांपैकी १३८ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांपैकी १९४ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १६६६ शाळांपैकी १५३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.दरवर्षी जगात जवळ-जवळ ६४ लाख लोक तंबाखू मुळे मरण पावतात.सन २०३० पर्यंत जगात तंबाखूने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार आहे. भारतात दररोज दोन हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यू होतो. वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूने एकट्या भारतात मृत्यूमुखी पावतात.तंबाखूमुळे होणाºया तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधीक रूग्ण भारतात आहेत. इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले.धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे. या तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे.या अभियानाला यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागला आहे.उपाय तंबाखू सोडण्याचेतंबाखू सोडण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबीय, नातलग किंवा मित्रांसमोर करावी, तंबाखूसाठी प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहावे, तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, धावा किंवा दोरीवरील उड्या घ्याव्या, प्राणायाम, कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थाचे सेवन करावे. तंबाखू सेवनाने शरीरात अस्तीत्वात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना शेअर कराव्यात.तंबाखूमुळे होणारे दुष्परिणामतंबाखू सेवनामुळे अनेक दुष्परिणाम होतात. केसांना दुर्गंध येते. तोंडाची दुर्गंधी, दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात. त्यांची मजबूती नष्ट होते. दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात. वास घेण्याची क्षमता कमी होते.चेहºयावर सुरकुत्या पडतात. शरीरात अशक्तपणा जाणवतो.हाडे ठिसूळ होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. डोळ्यांमध्ये जळजळ होत डोळ्यातून पाणी येते. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. विचार करण्याची क्षमता कमी होते. चित्त एकाग्र करणे कठिण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलीका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरिन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह, मोतीबिंदू होते. पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरूष नपंूसक बनतो.ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.५० शाळांची नोंदणी रद्दआपली शाळा तंखाखूमुक्त शाळा झाली म्हणून स्वयं माहिती अ‍ॅपमध्ये टाकावी लागते.जिल्ह्यातील १६६६ शाळांमपैकी १६०१ शाळांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १५३६ शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. ५० शाळांची नोंदणी रद्द झाली आहे. त्यात अर्जुनी-मोरगावच्या ४ शाळा, गोंदियाच्या २३ शाळा, गोरेगावच्या १३ शाळा, सालेकसाच्या ६ शाळा, तिरोडाच्या ४ शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी