शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीमुळे १५१४ घरांची पडझड

By admin | Updated: June 18, 2016 01:10 IST

तालुक्यात झालेल्या वादळाने ५ जून रोजी १७८ घराचे नुकसान झाले. त्यातच ११ गावातील ४९ घरांचे नुकसानग्रस्तांंना ६३ हजार ९०० रुपये निधी वाटप करण्यात आले.

महाराजस्व अभियान : शिबिरात अनेक शासकीय योजनांचा आढावाआमगाव : तालुक्यात झालेल्या वादळाने ५ जून रोजी १७८ घराचे नुकसान झाले. त्यातच ११ गावातील ४९ घरांचे नुकसानग्रस्तांंना ६३ हजार ९०० रुपये निधी वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे आमगाव तालुक्यातील १ हजार ५१४ घरांची पडझड झाली. त्यांच्यासाठी ३० लाख ७० हजार ५०० रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली अशी माहिती तहसीलदार एस.टी. राठोड यांनी दिली. तहसील कार्यालय आमगावच्या वतीने महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपवनसंरक्षक रामगावकर, जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, नायब तहसीलदार एस.जी.पवार, जि.प. सदस्य जियालाल पंधरे, एस.एच. कटरे, पं.स. सभापती व उपसभापती उपस्थित होते. यावेळी तहसीलदार एस.टी. पवार यांनी शासनाच्या योजनांचा सविस्तर आकडेसहीत गोषवारा सादर केला. उद्घाटनाप्रसंगी आ. संजय पुराम यांनी शासकीय योजनाचा सर्वसामान्य जनतेपर्यंत लाभ मिळावा याकरिता प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी जागृक ठेवून तत्परतेने काम करावे. कोणत्याच कामात हलगर्जी नको. पारदर्शकता ठेवून गोरगरिबाना शासकीय योजनाचा लाभ द्यावा. तहसीलदार एस.टी. पवार यांनी सन २०१५-१६ मध्ये तीन दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३८९० दाखले वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एकूण लाभार्थी ७३११ आहेत. त्यांना मे पर्यंत अनुदान वाटप करण्यात आले. आता नवीन २७४ अर्जापैकी २४० अर्ज मंजूर करण्यात आले. २१ मे रोजी भिंत पडून मृत्यू झालेले सीताराम राखडे याना आ. संजय पुराम यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश वाटप करण्यात आले. जनावरे दगावली अशा व्यक्तींना धनादेश आमदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ८०८० कार्डधारक आहेत. त्यांना दरमहा ८०८ क्विंटल गहू व २०२० क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येतो. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ५२ हजार ४६१ लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा १०४९ क्विंटल गहू व १५७३ क्विंटल तांदूळ वाटप केले जाते, अशीही माहिती तहसीलदार एस.टी. राठोड यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)