शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात देहविक्री करणाऱ्या १५० महिलांना मिळणार २६ लाखांची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:29 IST

Gondia News गोंदिया जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या १५० महिलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे पैसे मदत म्हणून दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे५४ महिलांची मुले घेतात शिक्षणकोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दिली जातेय मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या १५० महिलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे पैसे मदत म्हणून दिले जाणार आहे. ५ हजार रुपये महिन्याप्रमाणे तीन महिन्याचे १५ हजार रुपये प्रत्येक देहव्यवसाय करणाऱ्या त्या महिलांना मिळणार आहे. ५४ महिलांची मुले शाळेत जात असल्यामुळे मुलांचे अडीच हजार रुपये महिना प्रमाणे तीन महिन्याचे ७ हजार ५०० रुपये मुलांचे म्हणून त्या महिलांना दिले जाणार आहे.

कोरोनामुळे देहव्यवसाय करणाऱ्या महिलांचा व्यवसाय बुडाला त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले म्हणून सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. क्रिमीनल अपिल क्र.१३५/२०१० (बुधादेव करमास्कर विरुध्द स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल व इतर) मधील आदेशानुसार वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत, आदेश पारीत करण्यात आला. या आदेशावरून गोंदिया जिल्ह्यातील किती महिला देहव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात याची माहिती गोंदियातील एका सामाजिक संस्थेने घेतली. यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या महिलांना ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचे प्रत्येक महिन्याला ५ हजार रूपयांप्रमाणे तीन महिन्याचे १५ हजार रुपये एका महिलेला दिले जाणार आहेत. ५४ महिलांचे मुले शाळेत जात असल्याने त्यांच्या मुलांसाठी १२ लाख १५ हजार, तर महिलांना १४ लाख ४० हजार असे एकूण २६ लाख ५५ हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी तुषार पवनीकर यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकार