शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१५ पशूवैद्यकीय दवाखाने झाले ‘आयएसओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:03 IST

आता यांत्रीकीकरण होऊ लागल्याने जनावरांची जागा यंत्राने घेतली असली तरी पशूधन किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचे काम जिल्हा परिषदेचा पशू संवर्धन विभाग करीत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७२ दवाखाने : ५३ दवाखान्यांतील अधिकारी उदासीन

नरेश रहिले ।ऑनलाईन लोकमतगोंदिया :आता यांत्रीकीकरण होऊ लागल्याने जनावरांची जागा यंत्राने घेतली असली तरी पशूधन किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याचे काम जिल्हा परिषदेचा पशू संवर्धन विभाग करीत आहे. मागच्या वर्षापर्यंत पशू वैद्यकीय दवाखान्यासंदर्भात जे शेतकरी नाक मुरडत होते. आता तेच शेतकरी येथील सेवांमुळे वर्षभरातच खुश झाले आहेत. शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा देण्यात यशस्वी ठरलेल्या जिल्ह्यातील श्रेणी १ च्या १५ पशू वैद्यकीय दवाखान्यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत. शेतीवर निर्भर असलेले लोक शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशू पालन करतात. त्या पशूंचे संवर्धन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना मदत केली जाते. परंतु पाहीजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना डांग्या व घटसर्प असे विविध आजार होतात. त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सोबतच जनावरांना कत्तलीसाठी रवाना केले जात असल्याने जनावरांच्या संख्येत घट होत आहे. या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करून शेतकºयांच्या पशूंचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यातील ७२ ठिकाणी उघडण्यात आलेले दवाखाने आजही जनावरांना संपूर्ण सेवा देण्यासाठी अपयशी ठरत आहेत.गोंदिया जिल्हा परिषदेत जिल्हा पशू संवर्धन अधिकारी म्हणून वर्षभरापासून रूजू झालेले डॉ. राजेश वासनिक यांनी जिल्ह्यातील पशू वैद्यकीय दवाखान्यांची हालत दुरूस्त करण्याचा विडा उचलला. त्यांनी सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून आपापले दवाखाने उत्तम कसे करता येईल यावर भर दिला. याचाच परिपाक म्हणून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १५ पशू वैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’ प्रमाणित झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात श्रेणी १ चे ४२ पशू वैद्यकीय दवाखाने तर श्रेणी २ चे ३० पशू वैद्यकीय दवाखाने आहेत.हे पशू वैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’गोंदिया जिल्ह्यात श्रेणी १ चे ४२ दवाखाने असून यातील १५ दवाखाने ‘आयएसओ’ झाले आहेत. तर श्रेणी १ चे २७ व श्रेणी २ चे ३० दवाखाने दवाखाने तसेच पडून आहेत. परंतु त्या दवाखान्यांच्या उद्धारासाठी येथील डॉक्टरांमध्ये तळमळ दिसून येत नाही. आयएसओ झालेल्या दवाखान्यांमध्ये पांढराबोडी, कारंजा, कामठा, देवरी, आसोली, दासगाव, साखरीटोला, गोऱ्हे, विचारपूर, पुराडा, कडीकसा, कुºहाडी, चोपा, चिरचाळबांध व घाट्टेमणी यांचा समावेश आहे.लोकांच्याच खिशाला कात्रीपशू वैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्यासाठी त्या दवाखान्याला सुसज्ज करणे आवश्यक असते. त्या दवाखान्यात ज्या-ज्या गोष्टींची गरज आहे त्या-त्या गोष्टी पुरविणे आवश्यक आहे. शासन एकीकडे आयएसओ करा अशी ताकीद संबधीत यंत्रणेला देते. परंतु आयएसओ करण्यासाठी त्या दवाखान्यांना गरज असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे देत नाही. लोकवर्गणी करा किंवा पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांने स्वत:च्या खिशातील पैसे टाका आम्हाला माहिती नाही. फक्त दवाखाने आयएसओ झाले पाहिजे या सुत्रामुळे डॉक्टरांनी लोकांच्या खिशाला कात्री लावून हे दवाखाने सुसज्ज केले. डिजीटल शाळांसारखीच स्थिती आयएसओ पशू वैद्यकीय दवाखान्यांची आहे.