शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातून जाणाऱ्या १५ रेल्वेगाड्या रद्द

By admin | Updated: June 28, 2015 01:11 IST

पश्चिम मध्य रेल्वेच्या इटारसी आरआरआय कॅबिनला (रूट रिले इंटिरलॉकिंग) आग लागल्यामुळे

तारांबळ : रेल्वे प्रवास तीन दिवसांपासून झाला विस्कळीतगोंदिया : पश्चिम मध्य रेल्वेच्या इटारसी आरआरआय कॅबिनला (रूट रिले इंटिरलॉकिंग) आग लागल्यामुळे व भोपाल मंडळात नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य सुरू असल्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेशी संबंधित १५ प्रवासी गाड्या रद्द तर दोन गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे. आरआरआय कॅबिनमधून रेल्वे गाड्यांचे मार्ग परिवर्तन, संचालन आदी बाबी होतात. आरआरआय कॅबीनमध्ये सुधारणा होईपर्यंत या गाड्या २८ जूनपर्यंत प्रभावित राहणार आहेत. २४ जून रोजी बिलासपूर रोजी बिलासपूरवरून सुटणारी बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस (१८२३७) रद्द करण्यात आली होती. तर अमृतसरवरून सुटणारी अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्सप्रेस (१८२३३८) २४ व २७ जूनसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. २४, २५, २६, २७ व २८ जून रोजी बिलासपूरवरून सुटणारी बिलासपूर-इंदूर नर्मदा एक्सप्रेस (१८२३४) व इंदोरवरून सुटणारी इंदोर-बिलासपूर नर्मदा एक्सप्रेस (१८२३३), छिंदवाडावरून सुटणारी छिंदवाडा-इंदोर पंचवेली पॅसेंजर (५९३८६) व इंदोरवरून सुटणारी इंदोर-छिंदवाडा पंचवेली पॅसेंजर (५९३८६) या गाड्यांचा प्रवास रद्द करण्यात आला.२५ व २७ जून रोजी छिंदवाडावरून सुटणारी छिंदवाडा-दिल्ली सराय रोहिल्ला पातालकोट एक्सप्रेस (१४००९) व २४, २६ व २८ जून रोजी दिल्ली सराय रोहिल्लावरून सुटणारी (१४०१०) दिल्ली सराय रोहिल्ला-छिंदवाडा पातालकोट एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. २५ जून रोजी बिलासपूरवरून सुटणारी (०८२४५) बिलासपूर-बिकानेर व २७ जून रोजी बिकानेरवरून सुटणारी (०८२४६) बिकानेर-बिलासपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या.२७ जून रोजी भगत की कोठीवरून सुटणारी (०८२४४) भगत की कोठी-बिलासपूर एक्सप्रेस रद्द, २५ व २७ जून रोजी निजामुद्दीनवरून सुटणारी (१२८०८) निजामुद्दीन-विशाखापट्टनम समता एक्सप्रेस तसेच २५ व २८ जून रोजी विशाखापट्टणमवरून सुटणारी (१२८०७) विशाखापट्टणम-निजामुद्दीन समता एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. या गाड्यांचा प्रवास रद्द झाल्याने गोंदिया रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांची एकच तारांबळ उडत आहे.(प्रतिनिधी)दोन गाड्यांचे मार्ग परिवर्तन२८ जूनपर्यंत दुर्गवरून सुटणारी (१२८५३) दुर्ग-भोपाल अमरकंटक एक्स्प्रेसचा मार्ग परिवर्तन करण्यात आला आहे. ही गाडी आता बिलासपूर-शहडोल-न्यू कटनी-कटनी मुरवाडा- बीना या मार्गाने धावत आहे. तर २४ ते २८ जूनपर्यंत भोपाळवरून सुटणारी (१२८५४) भोपाल-दुर्ग अमरकंटक एक्स्प्रेस आता बीना-कटनी मुरवाडा-न्यू कटनी-शहडोल-बिलासपूर या मार्गाने धावत आहे.