शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार महिला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर

By admin | Updated: March 8, 2017 00:52 IST

कोणतेही काम करण्याची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की विकासाचा मार्ग प्रशस्त होतो.

सालेकसा तालुक्यात महिला क्रांती : पुरूषप्रधान व्यवसायांवर मिळविला दोन हजार महिलांनी ताबा कारु टोल्यात सावित्रीच्या लेकींचा स्वावलंबनाचा मार्ग गोंदिया : कोणतेही काम करण्याची तयारी असली आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की विकासाचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यातील मागास, दुर्गम व आदिवासीबहुल असलेल्या सालेकसा तालुक्यातील असंघटित महिलांना बचतगटाच्या माध्यमातून नवी दिशा मिळाली आहे. कारूटोला येथील सावित्रीच्या लेकींनी स्वावलंबनातून प्रगतीचा मार्ग साधला आहे. महिलांना संघटीत करून त्यांना उद्योग/व्यवसायाचे प्रशिक्षण देवून स्वावलंबनाचा मार्ग दाखिवला तो महिला आर्थिक विकास महामंडळाने. सालेकसा तालुका तसा मागास, नक्षलदृष्ट्या संवेदनशील आण िआदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्यातील आमगाव-देवरी मार्गावर असलेले कारु टोला नावाचं गाव. १९० कुटुंब असलेल्या कारुटोल्याची लोकसंख्या ७७ इतकी आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने ३० जानेवारी २००३ रोजी गावातील १४ महिलांना एकत्र करु न सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला महिन्याला प्रतिमहिला २० रु पये बचत करायच्या, आता ही बचत प्रत्येकीची बचतगटात महिन्याकाठी १५० रुपये होत आहे. सावित्रीबाई फुले बचतगटातील महिलांना माविमंचे योग्य मार्गदर्शन व वेळोवेळी मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांच्यात व्यवसाय सुरु करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. गावातील शाळेला आहार पुरवठा करण्यासोबत स्वस्त धान्य दुकान चालविण्याचे काम या बचतगटातील महिला करीत आहे. ५ महिलांनी दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी ३ लाख रु पये कर्ज घेवून म्हशी खरेदी केल्या आहेत. २ महिला भाजीपाला व्यवसाय, ४ महिलांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला असून २ महिलांनी बचतगटाच्या भरोशावर शेतीसुध्दा खरेदी केली आहे. तसेच याच बचतगटातील महिला हळद मशीन व शिवणकामाचा व्यवसाय करुन स्वावलंबी जीवन जगत आहे. सावित्रीबाई बचतगटातील महिलांनी आयसीआयसीआय बँकेचे ७ लाख ५० हजार रु पये कर्ज घेतले. कर्जाची हप्ते त्या वेळीच भरत आहे. संजीवनी ग्रामसंस्थेने या गटाला सामुदायिक गुंतवणूक निधीतून ५० हजार रु पये दिले आहे. गरीबांची गाय म्हणून ओळख असलेल्या बकरी पालन व्यवसायाला बचतगटातील सर्वच महिलांनी सुरूवात केली. या व्यवसायातून प्रत्येक महिलेला ५००० रु पये नफा मिळाला. या नफ्यातून आपण सक्षमपणे व्यवसाय करु शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. सालेकसा येथील लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून जानेवारी २०१४ मध्ये आयसीआयसीआय बँकेचे ३ लक्ष रु पयांचे कर्ज सावित्री बचतगटातील सर्व महिलांनी घेतले. कर्जाची गुंतवणूक त्यांनी विविध व्यवसायात केली. ३६ महिन्यात न चुकता दर महिन्याला १०५०० रुपये याप्रमाणे मासिक किस्तही भरली. त्यानंतर त्यांनी पुन्हा ७ लक्ष ५० हजार रु पये कर्जाची मागणी बँकेकडे केली. बँकेने बचतगटाचा व्यवसाय आणि बँकेकडे केलेली कर्जाची परतफेड बघता मागणीप्रमाणे ७ लक्ष ५० हजार रु पयाचे कर्ज देखील दिले. बचतगटातील ६ महिलांनी दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी या कर्जाचा विनियोग केला. दर मिहन्याला २६ हजार २५० रु पये कर्जाची परतफेड नियमीत करीत असून २४ महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १५ लक्ष रु पये कर्ज घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. महिला दुग्ध व्यवसाय करीत असल्यामुळे दुधापासून दही, ताक, तुप हे सुध्दा त्या तयार करु न विकत आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा दर्जा अत्यंत चांगला असून मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत आहे. बचतगटामुळे सावित्रीबाई फुले बचतगटातील सर्व महिलांना स्वावलंबनाचा मार्ग मिळाला आहे. घरच्या कर्त्या पुरु षाला आर्थिक मदतीचा हात देखील या महिला देत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं रहाटगाडगं चांगल्याप्रकारे सुरु आहे. (जिल्हा प्रतिनिधी)