शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१५ टक्के नागरिक निरक्षर

By admin | Updated: August 8, 2015 01:54 IST

निरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले.

दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद : जिल्ह्यात ७५ हजार प्रौढ निरक्षरनरेश रहिले गोंदियानिरक्षरांना नवसाक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत ८ एप्रिल २०११ पासून साक्षर भारत अभियान सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षे थातूरमातूर पध्दतीने चाललेल्या या अभियानाचा जिल्ह्यातील लोकांना कोणताच फायदा झाला नाही. जिल्ह्यात आजही ७५ हजार लोक निरक्षर असल्याची कबुली निरंतर शिक्षण विभाग देत आहे. निरक्षरांची ही संख्या १५ टक्के आहे.१५ वर्षावरील व्यक्तींना साक्षर करून त्यांना चौथी, आठवी व त्यावरील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे, आक्षर झालेल्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व घेतलेले शिक्षण कायम राहील याचे नियोजन करण्यासाठी केंद्र शासनाने साक्षर भारत अभियान अंमलात आणले. सन २०१० मध्ये जि.प. शाळातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी निरक्षरांचा आकडा एक लाख पाच हजाराच्या घरात होता. त्यांनतर डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ पर्यंत या तीन महिन्यात निरक्षरांना साक्षर करण्यात आले. त्यावेळी २५ हजार जणांना नवसाक्षर करण्याचे उद्दीष्ट असताना २३ हजार जणांना नवसाक्षर करण्यात आले. मार्च २०१३ ला या अभियानासाठी निधी आला नाही. परिणामी हे अभियान बंद राहीले. शासनाने आता पुन्हा नव्याने प्रत्येक निरक्षरामागे अनुदान देण्याचे ठरविले. त्यासाठी नवीन सर्वेक्षण करण्याचे ठरविले. निरंतर शिक्षण विभागाने सर्वेक्षणासाठी प्रेरक नियुक्त करून महिनाभरात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात आले. महिला निरक्षरांचे प्रमाण ६५ टक्केनिरंतर शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गोंदिया जिल्ह्यात ७५ हजार लोक निरक्षर आढळले. यात महिलांचे प्रमाण ६५ टक्के आहे. तर पुरूषांचे प्रमाण ३५ टक्के आहे. सन २०११ मध्ये जिल्हास्तरावर पुस्तकासाठी १३ लाख ६४ हजार रूपये देण्यात आले होते. त्यातून पुस्तक खरेदी करण्यात आले. त्यानंतर टेबल, खुर्ची व कपाटासाठी निधी देण्यात आला होता. मार्च २०१३ मध्ये हा कार्यक्रम बंद असल्यामुळे निरक्षरांना साक्षर करता आले नाही. फक्त तीनच महिने शिकविल्यामुळे निरक्षरांची संख्या जास्त आहे. ११०० प्रेरकांना सोडले वाऱ्यावरनिरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रत्येक गावात दोन प्रेरक तयार करण्यात आले. त्यांना २ हजार रूपये मानधनावर नेमण्यात आले होते. सुरूवातीचे तीन महिने काम केल्यानंतर त्यांना बंद करण्यात आले. पैश्याअभावी त्यांना बंद करण्यात आले. जिल्ह्यातील ११०० प्रेरक वस्तीशाळा शिक्षकांप्रमाणे आशा ठेवून बसले होते. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे ते निराशेत आहेत. उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकारगोंदिया जिल्हा निर्मितीला १६ वर्षाचा कालावधी लोटला, मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी निरंतर शिक्षण विभागाचे कार्यालय नाही. हे काम भंडारावरून चालते. या संदर्भात केव्हाही संपर्क केल्यावर टाळाटाळीचे उत्तरे दिले जाते. अनेक वेळा फोनच उचलला जात नाही. या कार्यालयात उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.