शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे १४ नखे, ४ दात व जबडाही मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली. १६ नोव्हेंबरपासून वन कर्मचाऱ्यांनी गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगांव- नागझिरा व्याघ्र राखीय क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले. मृत वाघाचे अवशेष आढळलेल्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना व इतर संशयीत इसमाना चौकशी करीता उपवनसंरक्षक कार्यालय गोंदिया येथे बोलविण्यात आले. 

ठळक मुद्देलोधीटोला वाघ शिकारीचा तपास अपूर्णच : वनाधिकारी घेताहेत शोध

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   गोंदिया वनविभागांतर्गत गोंदिया वनपरिक्षेत्रातील, मुंडीपार सहायक वनक्षेत्रातील चुटिया नियत क्षेत्रात येत असलेल्या  लोधीटोला येथे १५ नोव्हेंबर रोजी एका पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे उघडकीस आले. या संदर्भात १६ नोव्हेंबर गोंदिया वनिवभागाने वन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु वाघाचे बहुतांश अवयव अजूनही गायब आहेत. त्या अवयवांचा शोध गोंदिया वनविभाग घेत असल्याची माहिती सहाय्यक उपवन संरक्षक राजेंद्र सदगीर यांनी दिली. पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली. १६ नोव्हेंबरपासून वन कर्मचाऱ्यांनी गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगांव- नागझिरा व्याघ्र राखीय क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले. मृत वाघाचे अवशेष आढळलेल्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना व इतर संशयीत इसमाना चौकशी करीता उपवनसंरक्षक कार्यालय गोंदिया येथे बोलविण्यात आले. चौकशीत रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोला, बालचंद सोनू राणे रा. चुटिया, छेदीलाल पटले (४५) रा. इंदिरानगर पिंडकेपार व बाबा शरणागत (५५) रा. चुटीया यांनी करंट लावून वाघाची शिकार केल्याचे तपासात आढळुन आले. त्या पाचही जणांना अटक करण्यात आली. आधी तिघांना २५ नोव्हेंबर रोजी  तर दोघांना २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने वनकोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी देऊन जामीन मंजूर झाला आहे. या घटनेत वाघाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली. परंतु वाघाचे १४ नखे, ४ दात व वाघाचा जबडा अजूनही वनविभागाला मिळाला नाही. याचाच अर्थ या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असावा असा कयास लावून वनविभाग तपास करीत आहे.

टॅग्स :Tigerवाघ