शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या चाचणीसाठी १४ किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कमी कालावधीत चाचण्या कश्या होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरेगाव येथील बंद केलेले कोविड केअर सेंटर आणि चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. 

ठळक मुद्देगणखैरा येथील केंद्र बंद, शिक्षकांसह नागरिकांची गैरसोय

 दिलीप चव्हाण    लोकमत न्यूज नेटवर्क    गोरेगाव:  गोरेगाव : तालुक्यातील गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लीक स्कूलमध्ये सहा महिन्यांपूर्वी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. या कोविड सेंटरवर गोरेगाव तालुक्यासह गणखैरा परिसरातील नागरिक कोरोना चाचणीसाठी येत होते. या कोविड केअर सेंटर सुध्दा होते. मात्र ११ दिवसांपासून हे सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे या तालुक्यातील शिक्षकांसह नागरिकांना १४ किमीची पायपीट करीत गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात यावे लागत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील तीन कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वी चे वर्ग सुरु होणार असल्याने शिक्षकांनी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मागील तीन चार दिवसांपासून कोरोना चाचणी करण्यासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयातील तपासणी केंद्रावर कोरोना चाचणी करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यातच गोंदिया ते गोरेगाव हे अंतर १४ किमीचे असून गाेरेगाव येथील केंद्र बंद झाल्याने येथील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गोरेगाव तालुक्यात ९ ते १२ वीच्या एकूण ३५ शाळा असून यामध्ये ३०३ शिक्षक आणि १४१ कर्मचारी कार्यरत होणार आहे. या सर्वांना कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने कमी कालावधीत चाचण्या कश्या होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरेगाव येथील बंद केलेले कोविड केअर सेंटर आणि चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. दीडशे शिक्षक व कर्मचाऱ्यांची चाचणी  ९ ते १२ वीचे वर्ग २३ नाेव्हेंबरपासून सुरु होणार असून यासाठी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यातंर्गत २० नाेव्हेंबरपर्यंत ११४ शिक्षक व ३३ कर्मचाऱ्यांनी चाचणी केल्याचे प्रमाणपत्र खंडविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. ९६४ पालकांनी दिले संमतीपत्र २३ नाेंव्हेबर पासून शाळा सुरु होणार असून यासाठी पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमत्तीपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यातंर्गत २१ नाेव्हेंबरपर्यंत ९६४ पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र दिले.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या