शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

१४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 15, 2014 22:58 IST

धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट

गोंदिया : धान उत्पादकांच्या या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न नसला तरी पोटापुरते कमावून खाणारा आहे. कर्ज काढून भपकेबाजपणा दाखविण्याची सवय नसल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कितीही वाईट परिस्थिती आली तरी ते आत्महत्येच्या वाटेने जात नाहीत. मात्र यावर्षी गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत १४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणासह इतरही कारणे असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांच्या आत्महत्या दरवर्षीच होत असतात. मात्र यावर्षी आत्महत्यांचे हे प्रमाण वाढले आहे. सडक/अर्जुनी तालुक्याच्या चिंगी येथील नानाजी श्रीपत रहिले (४०) या शेतकऱ्याने १ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरेगाव तालुक्याच्या चांदीटोला येथील धनलाल कुशन सोनटक्के (६५) यांनी ३१ मार्च रोजी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या झरपडा येथील बालकदास धर्मा खोब्रागडे (५२) या शेतकऱ्याने २० एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली. गोंदिया तालुक्याच्या सावरी येथील कपूरचंद यशवंत बिसेन (४७) यांनी २३ एप्रिल रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या बकी/मेनडकी येथील येथील मुलचंद महागू मेश्राम (६५) यांनी ६ मार्च रोजी विषप्राशन करून, तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील तानसेन दुर्गा परिहार (४८) यांनी १५ मे रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या पालांदूर/जमी. येथील सदाशिव फुकटू सोरले (४४) या शेतकऱ्याने २५ मे रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रेमचंद सुखराम भोवते यांनी २५ मे रोजी विष पा्रशन करून, देवरी तालुक्याच्या मुरपार येथील किशोर बिसन लटये (३४) यांनी ११ जून रोजी गळफास घेऊन, देवरी तालुक्याच्या शिरपूरबांध येथील पुरूषोत्तम बळीराम मेंढे यांनी १८ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या निमगाव येथील गोपाल मसाजी ठाकरे यांनी १७ आॅगस्ट रोजी गळफास घेऊन, सडक/अर्जुनी तालुक्याच्या डुंडा येथील प्रकाश रामाजी टेंभरे (४६) यांनी १४ जुलै रोजी विषप्राशन करून, अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या खोकरी येथील चंदू उरकुडा निंबार्ते(७०) यांनी ७ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून तर गोंदिया तालुक्याच्या मोगर्रा येथील झनकलाल सदाराम पटले (४५) यांनी १५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.या आत्महत्या नेमक्या कशामुळे झाल्या आहेत याची चौकशी सुरू आहे. काही आत्महत्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे झाल्याचे सिद्धही झाले आहे. यावर्षी शासनाच्या धान खरेदीला उशिर झाला. भावातही उत्पादन खर्चावर आधारित वाढ झाली नाही. गतवर्षी मिळालेला बोनसही यावर्षी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)