शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१३७ शस्त्रक्रियांनी दिले नवजीवन

By admin | Updated: March 6, 2015 01:43 IST

जागतिक महिला आरोग्य अभियानांतर्गत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात २६ डिसेंबर २०१४ पासून महिला आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे.

गोंदिया : जागतिक महिला आरोग्य अभियानांतर्गत तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात २६ डिसेंबर २०१४ पासून महिला आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण १३७ शस्त्रक्रिया व इतर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले आहे.आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रान्वये राज्यात २६ फेब्रुवारी २०१५ ते १२ मार्च २०१५ पर्यंत महिला आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ३ ते ७ मार्च २०१५ पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांचे उच्च रक्तताप (हायपरटेंशन), मधुमेहासाठी रक्त तपासणी, कर्करोग निदानासाठी गर्भाशय, स्तनांचा, मुखाचा कर्करोग तसेच मौखिक आरोग्याबाबत महिलांची तपासणी करण्यात येत आहे. सदर शिबिर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. शिबिर आयोजित करताना प्रत्येक आरोग्य संस्थांना त्यांची कार्यक्षेत्र वाटून देण्यात आली आहेत. त्यांच्या हद्दीतील १० ते १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील लोकसंख्या दर्शविण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यासाठी असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवित असलेल्या जिल्ह्यांनी २५ हजार महिलांची कर्करोग, उच्च रक्तताप व मधुमेह आजारासाठी तपासणी करावयाची आहे.तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २३ शस्त्रक्रिया (सिझेरियन), कुटुंबकल्याणच्या ५३ शस्त्रक्रिया, ६१ मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अनेक किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सिझेरियन व कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची तपासणी, दंत व नेत्र तपासणी, जेएसएसके, जेएसएसवाय, मानव विकास योजनांचा लाभ दिला जात आहे. गरजू महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक महिला आरोग्य अभियानांतर्गत रविवारी ८ मार्च २०१५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात ३० वर्षांवरील सर्व महिलांची मोफत तपासणी करण्यात येईल. गर्भाशय व तोंडाचा कर्करोग, उच्च रक्तताप, मधुमेह, सिकलसेल, डोळे व रक्तक्षयाची तपासणी होणार आहे. त्यासाठी फॉग्सी संघटनेचे स्त्रि रोग तज्ज्ञ ‘कोल्पोस्कोपी व पॅप्सस्मियर’ची तपासणी करण्यात येणार आहे. त्यातून गर्भशयाचे कर्करोग निदान झाल्यास तसेच संदर्भिय उपचार सेवा देण्यात येणार आहे. महिला जागृतीवर प्रोजेक्टरमार्फत पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी नगर परिषद तिरोडा, तिरोडा मेडीकल असोसिएशन, महिला मंडळे, अदानी फाऊंडेशन, लॉयन्स क्लब यांचे सहकार्य लाभत आहे.महिला आरोग्य अभियाच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात डॉ. शेफाली जैन, डॉ. सुनिता लढ्ढा, डॉ. स्वाती विद्यासागर, डॉ. संजय ज्ञानचंदानी, डॉ. दुर्गाप्रसाद पटले, डॉ. आशिष झरारिया, डॉ. रेखा दुबे, डॉ. चंद्रशेखर पारधी, डॉ. संजय भगत, डॉ. प्राची मिश्रा, डॉ. नागेश शेवाळे, डॉ. सीमा काळे, डॉ. सोनम लढ्ढा, डॉ. स्मिता राऊत, डॉ. अनिल डांगे, डॉ. कंचन रहांगडाले, डॉ. प्रिया ताजने, डॉ. प्रांजली पेटकर, डॉ. बोर्डेलिया व डॉ. गहेरवार सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)