ऑनलाईन लोकमतगोंदिया : स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आलेल्या १२७ कोटीेंच्या अर्थ संकल्पात अजून १० कोटी रुपयांची भर पडली आहे. बुधवारी (दि.२८) अर्थसंकल्पाला घेऊन विशेष आमसभा घेण्यात आली होती. या आमसभेत एकूण १३७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात काही नवीन प्रयोगांचा समावेश असून काही विभागांसाठी निधीची तरतूद वाढविण्यात आली आहे.नगर परिषदेने सोमवारी (दि.२६) १२७ कोटींचा प्रारूप अर्थसंकल्प सादर केला होता. यासाठी स्थायी समितीची सभा बोलाविण्यात आली होती. त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आमसभेची मंजुरी घ्यावयाची असल्याने बुधवारी (दि.२८) विशेष आमसभा घेण्यात आली. या सभेत अर्थसंकल्पावर चर्चा करीत काही गंभीर व अत्यावश्यक विषयांसाठी अधिकची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी अर्थसंकल्पात आणखी १० कोटींची भर पडली.अशात १२७ कोटींऐवजी १३७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला व त्याला आमसभेत मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेत आयोजीत या सभेला उपाध्यक्ष शिव शर्मा, सभापती शकील मंसुरी, दीपक बोबडे, आशालता चौधरी, विमल मानकर, रत्नमाला साहू, पक्षनेता घनशाम पानतवने, सुनील भालेराव, सतीश देशमुख, राजकुमार कुथे, लोकेश यादव, जितेंद्र पंचबुद्धे, सुनील तिवारी, निर्मला मिश्रा, कुंदा पंचबुद्धे, शिलू चव्हाण, सचिन शेंडे, अनिता मेश्राम, हेमलता पतेह, नेहा नायक, विवेक मिश्रा उपस्थित होते.हे आहेत नवीन विषयसभेत शहरवासीयांच्या सोयीसाठी नवीन विंधन विहीर खोदकाम करणे, नगर परिषद मालकीच्या जागांचे डीएलआर करून सुरक्षा भिंत तयार करणे, पाणी पुरवठा विभागासाठी दोन ट्रॅक्टर इंजन व टँकर खरेदी करणे, वरिष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्र उभारणे, मोठे नाले व तलाव खोलीकरण तसेच उन्हाळा बघता पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी पाणी पुरवठा विभागासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
१३७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:20 IST
स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आलेल्या १२७ कोटीेंच्या अर्थ संकल्पात अजून १० कोटी रुपयांची भर पडली आहे. बुधवारी (दि.२८) अर्थसंकल्पाला घेऊन विशेष आमसभा घेण्यात आली होती.
१३७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
ठळक मुद्देआमसभेत पारित : नवीन तरतुदींमुळे १० कोटींची वाढ