शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

१३५ अपंगांना वाटले ६२ लाखांचे कर्ज

By admin | Updated: December 11, 2015 02:19 IST

शारीरिक अपंगत्वाच्या ओझ्यामुळे उपेक्षित जीवन जगत असलेल्या अपंगांचे भविष्य घडविण्यात महाराष्ट्र राज्य विकलांग वित्त व विकास महामंडळ महत्वाची भूमिका निभावत आहे.

सन्मानजनक जीवन : अपंग वित्त व विकास महामंडळ घडवते भविष्यदेवानंद शहारे  गोंदियाशारीरिक अपंगत्वाच्या ओझ्यामुळे उपेक्षित जीवन जगत असलेल्या अपंगांचे भविष्य घडविण्यात महाराष्ट्र राज्य विकलांग वित्त व विकास महामंडळ महत्वाची भूमिका निभावत आहे. अपंगांना सन्मानजनक जीवन जगण्यासाठी रोजगार व शैक्षणिक कर्ज यासारख्या विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातूनच जिल्ह्यातील १३५ अपंगांना आतापर्यंत ६२ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.अपंगांसाठी महामंडळाच्या माध्यमातून व्यक्तिगत सरळ कर्ज योजना, सावधी कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, सुक्ष्म पतपुरवठा, शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण यासह ११ योजना सुरू आहेत. जिल्ह्यात व्यक्तिगत कर्ज योजना, सावधी कर्ज योजना व शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत १३४ अपंगांना ६२ लाख एक हजार २३० रूपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. महामंडळाद्वारे सरळ कर्ज योजनेंतर्गत १०६ लाभार्थ्यांना २१ लाख २० हजार रूपये, सावधी कर्ज योजनेंतर्गत २५ लाभार्थ्यांना ३६ लाख ९२ हजार ५०० रूपये व शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत तीन लाभार्थ्यांना तीन लाख ८८ हजार ७३० रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदर कर्ज सन २००६ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत वितरित करण्यात आले आहे.व्यवसायाचे ज्ञान आवश्यकमहामंडळाद्वारे लाभार्थ्यांना कर्जासाठी विविध अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यात लाभार्थी ४० टक्के अपंग असावा, त्यासह मागील १५ वर्षांपासून राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे. लाभार्थी कोणत्याही बँक, महामंडळ किंवा वित्तीय संस्थेचा कर्जदार नसावा. व्यक्तीद्वारे ज्या व्यवसायाची निवड केली जाते, त्याला त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. व्यक्तिगत थेट कर्ज योजना सोडून उर्वरित योजनांमध्ये महिलेसाठी व्याज दरात एक टक्का सुट देण्यात आली आहे. नेत्रहीन, मूकबधीर व मतिमंद व्यक्तीला अर्धा टक्के सुट देण्यात आली आहे. शासकीय व गैरशासकीय नोकरी करणाऱ्या अपंग व्यक्तीला कार लोनची स्किम उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदांची समस्या कायमगोंदियाच्या समाजकल्याण विभागातील अपंग वित्त व विकास महामंडळात कर्मचाऱ्यांची पदेच नाहीत. या महामंडळाचा प्रभार ओबीसी महामंडळाकडे आहे. येथे कंत्राटी पद्धतीवर एक महिला व एक पुरूष कामावर ठेवण्यात आले आहे. यामुळे या महामंडळाच्या कामात पाहिजे तेवढा सुसूत्रता आलेला नाही. मनुष्यबळ नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात कामे होत नसल्याचेही म्हणता येईल.