शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१३४ मंडळांनी घेतली जोडणी

By admin | Updated: September 21, 2015 01:37 IST

अवैधरित्या घेतलेल्या वीज चोरीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता पुढाकार घेतला आहे.

देवरी तालुका आघाडीवर : शहरात ३४ मंडळाचे अर्ज गोंदिया : अवैधरित्या घेतलेल्या वीज चोरीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता पुढाकार घेतला आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील १३४ मंडळांनी वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले असून त्यांना जोडणी देण्यात आली आहे. यात देवरी तालुका आघाडीवर असून ७८ कनेक्शन देण्यात आले आहेत. शिवाय गोंदिया शहरातील ३४ मंडळांचे अर्ज वीज वितरण कंपनीकडे आल्याचे कळले. जिल्ह्यात हजारांच्या घरात सार्वजनीक मंडळांकडून गणपतीची स्थापना करण्यात आली. यात देखावे व रोशनाईवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. उत्सवाच्या या थाटामाटात मात्र वीज चोरी करून पैसे वाचविण्याचा पराक्रम काही मंडळ करतात. कित्येकदा वीज चोरीच्या या प्रकारातून काही अपघात व अप्रिय घटना घडतात. लहानशा चुकीमुळे अख्ख्या उत्सवावर विरजण पडते. उत्सवाच्या काळात हे सर्व प्रकार टळावे व निर्विघ्न उत्सव साजरा व्हावा यासाठी वीज मंडळाकडून सवलतीच्या दरात वीज जोडणी दिली जाते. शिवाय जनजागृतीच्या माध्यमातूनही मंडळांना जागृत केले जाते. तसेच वीज चोरीवर आळा बसावा यासाठी वीज वितरण कंपनीचे भरारी पथक व दामिनी पथक तपासणी मोहीम राबवून कारवाया करतात. त्यानुसार यंदाही वीज वितरण कंपनीकडू सवतलीच्या दरात वीज जोडणी दिली जात असून मंडळांना वीज जोडणीसाठी आवाहन करण्यात आले. याचे फलीत असे की, जिल्ह्यातील १३४ मंडळांनी वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीला अर्ज दिले असून त्यांना अधिकृत वीज जोडणी देण्यात आली आहे. यात देवरी विभागात ७८ मंडळांनी वीज घेतली असून आतापर्यंत तरी देवरी विभाग वीज जोडणी घेण्यात आघाडीवर आहे. तर गोंदिया विभागात ५६ मंडळांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. यात ३४ अर्ज गोंदिया शहरातून असल्याची माहिती विद्युत विभागाने दिली आहे. (शहर प्रतिनिधी)